मिरजेत दोन गटांत हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:29 IST2021-05-27T04:29:38+5:302021-05-27T04:29:38+5:30

मिरज : मिरजेतील भगतसिंग वसाहतीत क्रिकेट खेळण्याच्या कारणातून दोन गटांत हाणामारी झाली. याबाबत दोन्ही गटांनी गांधी चौक पोलिसांत ...

Fighting between two groups in Miraj | मिरजेत दोन गटांत हाणामारी

मिरजेत दोन गटांत हाणामारी

मिरज : मिरजेतील भगतसिंग वसाहतीत क्रिकेट खेळण्याच्या कारणातून दोन गटांत हाणामारी झाली. याबाबत दोन्ही गटांनी गांधी चौक पोलिसांत परस्परविरोधी फिर्याद दिली आहे. सरिता मारुती भोसले यांनी रमेश, अजित, महेश, संदीप मारुती यांच्या विरुद्ध तर महेश दिलीप साळुंखे यांनी मारुती भोसले, गणपती भोसले, अविनाश भोसले, विशाल भोसले, पवन भोसले, विकी भोसले, राहुल अटक ( सर्व रा. गोंधळी गल्ली, मिरज) यांच्या विरुद्ध फिर्याद दिली आहे.

सरिता यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, क्रिकेटच्या कारणातून भांडणाच्या कारणावरून रमेश याने पाच जणांना एकत्र बोलावून मुलगा अविनाश व भाचा उदय यांना मारहाण करायला सुरुवात केली. त्यामुळे त्यांचे भांडण सोडविण्यासाठी गेले असता केस ओढून, मारहाण करून खाली पाडले. त्यानंतर मुलगा अविनाश याला महेश याने काठीने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली.

महेश साळुंखे यांनी क्रिकेट खेळत असताना झालेली भांडणे मिटविण्यासाठी मारुती भोसले यांनी लोकांना एकत्र बोलावून मुस्काडात मारली. इतरांनी विटेने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. मामी लक्ष्मी वाडेकर या भांडण सोडविण्यासाठी आल्या असता मारुती भोसले व अविनाश भोसले या दोघांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची तक्रार आहे. मारामारीबाबत दोन्ही गटांकडून गांधी चौक पोलिसांत परस्परविरोधी फिर्याद देण्यात आली आहे.

Web Title: Fighting between two groups in Miraj