दुधारीत दोन कुटुंबात हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:33 IST2021-07-07T04:33:47+5:302021-07-07T04:33:47+5:30

इस्लामपूर : दुधारी (ता. वाळवा) येथे महिलेच्या छेडछाडीच्या कारणावरून दोन कुटुंबांत हाणामारी झाली. त्यामध्ये दोघे जखमी झाले. हा प्रकार ...

Fighting between two families in Dudhari | दुधारीत दोन कुटुंबात हाणामारी

दुधारीत दोन कुटुंबात हाणामारी

इस्लामपूर : दुधारी (ता. वाळवा) येथे महिलेच्या छेडछाडीच्या कारणावरून दोन कुटुंबांत हाणामारी झाली. त्यामध्ये दोघे जखमी झाले. हा प्रकार मंगळवारी सकाळी ७.३० च्या सुमारास घडला. या प्रकरणी पोलिसांत परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्या आहेत. किरण कोळी व सागर गुजले अशी जखमीची नावे आहेत.

१९ वर्षीय विवाहितेने दिलेल्या फिर्यादीत शेजारी राहणाऱ्या सागर गुजले याच्याकडून वरचेवर छेडछाड होत होती. वारंवार मनात लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले जात होते. त्याच्याकडून हा त्रास वारंवार होत असल्याने किरण कोळी यांनी त्याचा जाब सागर गुजले याला विचारला. त्यावेळी सागर आणि त्याचे वडील उत्तम गुजले यांनी दगडाने डोक्यात मारहाण करून कोळी यांना गंभीर जखमी केले तर कोळी यांनी काचेच्या तुकड्याने सागर गुजले याच्या छातीवर मारून त्याला जखमी केले.

Web Title: Fighting between two families in Dudhari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.