कामेरी येथे दोन कुटुंबांत किरकोळ कारणावरून मारामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:25 IST2021-05-15T04:25:33+5:302021-05-15T04:25:33+5:30

इस्लामपूर : कामेरी (ता. वाळवा) येथे स्वयंपाक केला नाही म्हणून पत्नीस मारहाण केल्याच्या कारणातून दोन कुटुंबांमध्ये मारामारी झाली. हा ...

Fight for minor reasons between two families at Kameri | कामेरी येथे दोन कुटुंबांत किरकोळ कारणावरून मारामारी

कामेरी येथे दोन कुटुंबांत किरकोळ कारणावरून मारामारी

इस्लामपूर : कामेरी (ता. वाळवा) येथे स्वयंपाक केला नाही म्हणून पत्नीस मारहाण केल्याच्या कारणातून दोन कुटुंबांमध्ये मारामारी झाली. हा प्रकार गुरुवारी रात्री १०.१५च्या सुमारास घडला. याबाबत पोलिसांत परस्परविरोधी फिर्यादी दाखल करण्यात आल्या आहेत.

माणिक गंगाराम तांबीट (वय ४०) यांनी दिलेल्या फिर्यादीत प्रकाश बाळकृष्ण तांबीट आणि त्याची आई मीनाक्षी बाळकृष्ण तांबीट या दोघांनी लाकडी काठीने मारहाण केली. प्रकाश तांबीट यांनी स्वयंपाक न केल्याच्या कारणातून पत्नीस मारहाण केली. त्याचा जाब विचारण्यासाठी माणिक तांबीट आणि त्यांची बहीण गेली होती, तर प्रकाश याने काठीने माणिक यांच्या डोक्यात मारून त्यांना जखमी केले. माणिक यांच्या पत्नीनेही लाथाबुक्यांनी मारहाण करून जखमी केले.

प्रकाश तांबीट याने दिलेल्या फिर्यादीत माणिक गंगाराम तांबीट, पुष्पा गंगाराम तांबीट, सागर गंगाराम तांबीट व सविता गंगाराम तांबीट या चौघांनी मिळून प्रकाश याला काठीने, तर त्याच्या आईस लाथाबुक्यांनी मारहाण करत जखमी केले.

Web Title: Fight for minor reasons between two families at Kameri