केंद्राच्या बेजबाबदार कारभाराविरोधात लढा उभारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:23 IST2021-02-08T04:23:53+5:302021-02-08T04:23:53+5:30
संजयनगर : केंद्र सरकारच्या बेजबाबदार कारभाराविरोधात सर्वसामान्य जनतेसाठी युवक काँग्रेसने लढा उभा करावा या माध्यमातून काँग्रेस पक्ष तळागाळात ...

केंद्राच्या बेजबाबदार कारभाराविरोधात लढा उभारा
संजयनगर : केंद्र सरकारच्या बेजबाबदार कारभाराविरोधात सर्वसामान्य जनतेसाठी युवक काँग्रेसने लढा उभा करावा या माध्यमातून काँग्रेस पक्ष तळागाळात पोहोचवा, असे आवाहन कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी केले.
सांगली शहर युवक काँग्रेसची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. मंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्या हस्ते पदाधिकाऱ्यांना निवडीचे पत्र देण्यात आले. यानंतर आयोजित सभेत ते बोलत होते.
यावेळी काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील, काँग्रेसचे शहर-जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, नामदेवराव मोहिते, विशाल पाटील, डॉ. जितेश कदम, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व नगरसेवक मंगेश चव्हाण, युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष सुहेल बलबंड, बिपीन कदम, कय्युम पटवेगार, अमर निंबाळकर, अमित पारेकर, आदींसह कार्यकर्ते, पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका, आदी उपस्थित होते.
नूतन पदाधिकाऱ्यांमध्ये संग्राम गिरी (कार्याध्यक्ष), अमित उजगरे (उपाध्यक्ष), अरबाज शेख (उपाध्यक्ष), शैलेश शेजाळ (सरचिटणीस), जावेद मुल्ला (सरचिटणीस), संजय कुलकर्णी (महासचिव), मोहमद शेख (महासचिव), हिरा कांबळे (चिटणीस), स्वप्निल उंटवाले (समन्वयक, सोशल मीडिया) यांचा समावेश आहे.
फोटो-०७दुपटे१