सांगली जिल्ह्यात पंधरा अनधिकृत शाळा

By Admin | Updated: June 6, 2014 00:30 IST2014-06-06T00:30:18+5:302014-06-06T00:30:33+5:30

कारवाई होणार : प्रवेश न घेण्याची सूचना

Fifteen unauthorized schools in Sangli district | सांगली जिल्ह्यात पंधरा अनधिकृत शाळा

सांगली जिल्ह्यात पंधरा अनधिकृत शाळा

सांगली : जिल्ह्यात पंधरा अनधिकृत खासगी प्राथमिक शाळा कार्यरत आहेत. या शाळांमध्ये पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेऊ नये, असे आवाहन जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने केले आहे. अशा शाळेवर कारवाई केल्यामुळे पाल्यांचे नुकसान झाल्यास त्यास जिल्हा परिषद जबाबदार राहणार नसून, शासनाच्या कोणत्या सुविधाही त्या शाळांना मिळणार नाहीत.
जिल्ह्यात २०१४-१५ या शैक्षणिक वर्षामध्ये काही शाळांनी एक वर्ग, तर काही संस्थाचालकांनी इंग्रजी माध्यमाच्या शाळा शासनाची मान्यता न घेताच सुरु केल्या आहेत. या अनधिकृत शाळांमध्ये प्रवेशही सुरु झाले आहेत. अनधिकृत शाळेत प्रवेश घेऊ नये, असे आवाहन प्राथमिक शिक्षणाधिकारी नीशादेवी वाघमोडे यांनी केले आहे. अनधिकृत शाळांमध्ये जत तालुक्यातील येळदरी येथील सिध्देश्वर विद्यालय, खोजनवाडीतील सर्वोदय माध्यमिक विद्यालय, अचकनहळ्ळीतील सिध्देश्वर हायस्कूल, जाडरबोबलादमधील गजानन हायस्कूल, मज्जनग्यानावाडी येथील पी. एम. पाटील हायस्कूल या सर्व शाळांमध्ये आठवीचा वर्ग अनधिकृत सुरु आहे. सांगलीतील यशवंतनगरमधील विजय प्राथमिक शाळेत आठवीचा वर्ग आणि आशादीप स्कूल, सुप्रिम इंग्लिश मेडियम सांगली, मिरजेतील शब्बीर अन्सारी इंग्लिश मेडियम स्कूल, अ‍ॅड्. विलासराव कौलगुड प्राथमिक विद्यालय, मॉडर्न इंग्लिश स्कूल (म्हैसाळ) आणि डॉ. पी. के. इंग्लिश मेडियम स्कूल (कार्वे, ता. खानापूर), जिनिअस इंग्लिश मेडियम स्कूल (वासुंबे, ता. तासगाव) या शाळा अनधिकृत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Fifteen unauthorized schools in Sangli district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.