शेतात ड्रोनद्वारे औषध फवारणी करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:47 IST2021-02-06T04:47:03+5:302021-02-06T04:47:03+5:30
पेठ : आपला देश इतर देशांपेक्षा ऊस उत्पादनात कमी असून, अन्य देशात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ऊसाचे उत्पादन घेतले ...

शेतात ड्रोनद्वारे औषध फवारणी करावी
पेठ : आपला देश इतर देशांपेक्षा ऊस उत्पादनात कमी असून, अन्य देशात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ऊसाचे उत्पादन घेतले जाते. त्याप्रमाणे आपल्यालाही शेतीत आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून, ठिबक सिंचन व ड्रोनद्वारे औषध फवारणी करून शेतीचे उत्पादन वाढविणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन युवा नेते प्रतीक पाटील यांनी केले.
पेठ (ता. वाळवा) येथे शेतकरी परिसंवाद व राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना यांच्या तंत्रज्ञान गट शेती ठिबक सिंचन योजना कार्यक्रमांतर्गत आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी संचालक देवराज पाटील, आनंदराव पाटील उपस्थित होते.
प्रतीक पाटील म्हणाले, आपल्या शेतात पाण्याचा वापर जास्त होत असल्याने जमीन क्षारपड व नापीक होत आहे. आधुनिक शेतीच्या माध्यमातून कमीत कमी पाण्याचा वापर ठिबक सिंचनाद्वारे व कमी वेळात जास्त प्रमाणात आपल्या पिकांवर डोनद्व़ारे औषध फवारणी करावी. या तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन वाढवावे, असे आवाहन केले.
यावेळी सुभाष जमदाडे यांनी ठिबक सिंचन व ड्रोनद्वारे औषध फवारणीची माहिती दिली. अतुल पाटील यांनी प्रास्ताविक केले. डी. जी. खोत यांनी सूत्रसंचालन केले तर माजी उपसरपंच संदीप पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमाला विजय पाटील, अतुल पाटील, सुजयकुमार पाटील, शरद पाटील, हेमंत पाटील, प्रशांत पाटील, रोहित पाटील, हंबीरराव पाटील, संजय शिंदे, नामदेव मोहिते आदी उपस्थित होते.
फोटो - ०४०२२०२०-आयएसएलएम - पेठ न्यूज
पेठ (ता. वाळवा) येथील शेतकरी परिसंवादात प्रतीक पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी संचालक देवराज पाटील, आनंदराव पाटील, अतुल पाटील, संदीप पाटील, विजय पाटील उपस्थित होते.