कुठल्याही वयोगटातील ताप, पुरळ असू शकतो गोवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:29 IST2021-08-22T04:29:07+5:302021-08-22T04:29:07+5:30

सांगली : बदलते वातावरण आणि सुरू असलेला ऊन-पावसाचा खेळ नागरिकांचे आरोग्य बिघडवत आहे. अगोदरच कोरोनासह इतर आजारांचेही प्रमाण वाढतच ...

Fever, acne can be measles at any age! | कुठल्याही वयोगटातील ताप, पुरळ असू शकतो गोवर!

कुठल्याही वयोगटातील ताप, पुरळ असू शकतो गोवर!

सांगली : बदलते वातावरण आणि सुरू असलेला ऊन-पावसाचा खेळ नागरिकांचे आरोग्य बिघडवत आहे. अगोदरच कोरोनासह इतर आजारांचेही प्रमाण वाढतच आहे. कोणत्याही वयोगटात आलेल्या ताप, शरीरावरील पुरळांकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार घेणे आवश्यक आहे. जिल्ह्यात गोवर नियंत्रणात असला तरी विषाणूच्या संसर्गामुळे गोवर, रुबेलाची शक्यता असल्याने ताप व शरीरावरील पुरळांकडे दुर्लक्ष करू नका, असे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे.

विषाणूच्या संसर्गामुळे होणाऱ्या गोवरचा प्रसार शिंकणे व खोकण्यातून होत असतो. चार ते सहा दिवसांच्या तापानंतर तो दुसऱ्या व्यक्तीमध्ये संक्रमित होतो. कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला आलेला ताप हा गोवरचाच आहे हे ओळखण्यासाठी चाचणी आवश्यक असली तरी रुबेलाची लक्षणे मुली, महिलांसाठी त्रासदायक ठरू शकतात.

चाैकट

असे केले जाते निदान

* गोवर, रुबेलाचे प्रमाण नियंत्रणात असले तरीही शासकीय रुग्णालयात याबाबतचे उपचार करून त्याचे संक्रमण वाढणार नाही यास प्राधान्य देण्यात येते.

* चार ते सहा दिवसांचा सलग ताप व त्यानंतर शरीरावर उठलेल्या पुरळानंतर याबाबतचे उपचार सुरू केले जातात. याचे गंभीर परिणाम होत नसले तरी संसर्गाचा धोका असल्याने निदान आवश्यक आहे.

* गरोदर महिलांच्या नियमित तपासणीवेळी ‘टॉर्च टेस्ट’ करून रुबेला झाला होता का याबाबत माहिती घेतली जाते, जेणेकरून त्याचा परिणाम होणाऱ्या बाळावर होऊ नये.

चौकट

१०३ गोवर-रुबेलाचे टक्के लसीकरण

* संक्रमकामुळे घातक असलेल्या गोवरवर नियंत्रणासाठी सन २०१८ मध्ये संपूर्ण राज्यात एमआर लसीकरण करण्यात आले.

* या लसीकरणात सांगली जिल्ह्यात उद्दिष्टांपेक्षा जादा अर्थात १०३ टक्के लसीकरण पूर्ण करत जिल्ह्याने राज्यात दुसरा क्रमांक मिळवला आहे.

* सध्या एक वर्षाखालील मुलांसाठी हे नियमित लसीकरण सुरू करण्यात आले आहे.

चौकट

...तर डॉक्टरांना दाखवा

* ताप, खोकला, अशक्तपणा सलग असल्यास याबाबत तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

* गोवर, रुबेलामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होत असल्याने आजारपणात व नंतरही पूरक व पोषक आहारावर अधिक भर दिल्यास यातून लवकर स्वस्थ होता येते.

कोट

विषाणूंच्या संक्रमणामुळे गोवर, रुबेला होत असल्याने यावर वेळीच उपचार आवश्यक आहेत. यापासून बचावासाठी लसीकरण हाच प्रभावी उपाय आहे. लक्षणे दिसल्यास तातडीने उपचार घ्यावेत.

डॉ. विवेक पाटील

Web Title: Fever, acne can be measles at any age!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.