तुंग येथे खताच्या गोदामात आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:27 IST2021-01-23T04:27:26+5:302021-01-23T04:27:26+5:30

कसबे डिग्रज : तुंग (ता. मिरज) येथे बस स्थानकानजीक खताच्या गोदामाला आग लागून हजारो रुपयांचे नुकसान झाले. शुक्रवारी सकाळी ...

Fertilizer warehouse fire at Tung | तुंग येथे खताच्या गोदामात आग

तुंग येथे खताच्या गोदामात आग

कसबे डिग्रज : तुंग (ता. मिरज) येथे बस स्थानकानजीक खताच्या गोदामाला आग लागून हजारो रुपयांचे नुकसान झाले. शुक्रवारी सकाळी ११ वाजता ही घटना घडली. या घटनेची नोंद सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली आहे.

तुंग येथे हायस्कूलजवळ खासगी खताचे गोदाम आहे. शुक्रवारी सकाळी या गोदामातून अचानक धूर येत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर ग्रामस्थांनी याची माहिती गोदाम चालकास दिली. तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते. सांगली महापालिका व आष्टा नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला याची माहिती देण्यात आली. दोन अग्निशमन दलाच्या मदतीने तासभरात आग आटोक्यात आणण्यात यश आले. आगीचे कारण समजू शकले नाही. यामध्ये मोठ्या प्रमाणात खताची पोती जळून खाक झाल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Fertilizer warehouse fire at Tung