सांगली : आर्थिक वादातून डोर्ली (ता. तासगाव) येथील प्रशांत सूर्यकांत पाटील (वय ४०) या व्यापाऱ्यांचा लोखंडी सळईने हल्ला करुन निर्घृण खून करण्यात आला.विश्रामबाग येथे शंभरफूटी रस्त्यालगत फेडरल बँकेजवळ साई सदन अपार्टमेंटमध्ये गुरुवारी भरदिवसा ही घटना घडली. घटनेनंतर संशयित हल्लेखोर सरफराज ताजुद्दीन निपाणी (३२, रा. छत्रीबाग रस्ता, पाण्याच्या टाकीजवळ, जत) हा पसार झाला आहे. तो रिक्षा चालक आहे.
दोन वर्षापूर्वी त्यांनी हा फ्लॅट संशयित ताजुद्दीन निपाणी यास भाड्याने दिला होता. निपाणी हा सांगली-मिरज रस्त्यावर रिक्षा व्यवसाय करतो. वर्षापूर्वी त्याने पाटील यांच्याकडून कर्ज फेडण्यासाठी दोन लाख रुपये उसणे घेतले होते.
ही रक्कम दोन महिन्यात त्याने देतो, असे सांगितले होते. पण त्याने रक्कम परत केली नाही. त्यामुळे त्यांच्यात वाद सुरु होते. शुक्रवार पाटील रक्कम वसूलीसाठी गेले होते. त्यावेळी निपाणी याने लोखंडी सळईने हल्ला करुन त्यांचा खून केला.