शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

मोहिनी विद्येचा वापर, जीवितास धोका असल्याची भीती घालत दागिन्यांवर मारला डल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2022 18:44 IST

धोका टाळण्यासाठी तुमचे मंगळसूत्र व गंठण घेऊन येण्यास सांगत दागिन्यावर पूजा करतो असे सांगून चोरट्याने दागिने आपल्या ताब्यात घेत पोबारा केला

इस्लामपूर : येथील मंत्री कॉलनीतील एका महिलेवर मोहिनी विद्येचा प्रयोग करतानाच पती आणि मुलीच्या जीवितास धोका असल्याची भीती घालत अज्ञात चोरट्याने साडेतीन तोळे वजनाचे दीड लाखाचे सोने घेऊन पोबारा केला.याबाबत मिळालेली माहिती अशी की, नंदकुमार भोसले हे बँक अधिकारी मंत्री कॉलनीत राहतात. मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास भगवी वस्त्रे परिधान करून हातात ग्रंथ आणि जपमाळ घेऊन हा चोरटा भोसले यांच्या घरी आला. यावेळी त्यांच्या पत्नी अनिता भोसले यांनी घरी कोणी नाही असे सांगितले.मात्र तरीही या चोरट्याने भक्त असल्याचा बहाणा करत वर्गणी मागितली. अनिता भोसले यांनी ५१ रुपये दिल्यानंतर या चोरट्याचे समाधान झाले नाही.त्याने घरासमोर बैठक मारत तुमच्या पतीचे अपघाती निधन होणार आहे. तुमच्या मुलीच्या जीवितास धोका आहे, अशी भीती दाखवली. हा धोका टाळण्यासाठी तुमचे मंगळसूत्र व गंठण घेऊन या, असे सांगताच भोसले या घरामध्ये जाऊन दागिने घेऊन आल्या. या दागिन्यावर पूजा करतो असे सांगून चोरट्याने दागिने आपल्या ताब्यात घेतले.त्याचवेळी भोसले यांच्याकडे रुद्राक्ष देत हे देवघरामध्ये ठेवा, आत जाताना पाठीमागे वळून बघायचे नाही असे सांगितले. भोसले या रूद्राक्ष घेऊन आत जाताच या चोरट्याने दागिने घेऊन पलायन केले.

गुन्हा नाही फक्त तक्रार, पोलीस करणार प्रबोधनहा प्रकार घडल्यानंतर नंदकुमार भोसले हे पोलीस ठाण्यात गेले होते. तेथे त्यांनी गुन्हा दाखल करून घेण्याची विनंती केली. मात्र पोलिसांनी केवळ तक्रार घेत अशा भुरट्या चोरट्यांकडे दुर्लक्षच केले. तसेच मंत्री कॉलनी परिसरात नागरिकांचे प्रबोधन करण्यासाठी बैठक घेऊ, असा सल्ला दिला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचीही पोलिसांनी पाहणी केली.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारी