शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
2
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
3
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
4
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
5
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
6
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
7
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
8
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
9
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
10
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
11
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
12
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
13
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
14
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
15
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
16
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
17
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
18
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
19
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
20
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी

बारावीच्या परीक्षा तोंडावर, तरीही विद्यार्थ्यांना क्रीडा प्रमाणपत्रे नाहीत; ग्रेस गुण बुडण्याची भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2024 16:28 IST

क्रीडा विभागाचा सावळा गोंधळ

विकास शहाशिराळा : जिल्हा क्रीडा विभागातर्फे तालुका, जिल्हा व राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा घेण्यात‎ आल्या. त्याला बराच कालावधी लोटला, तरी अद्याप खेळाडूंना‎ प्रमाणपत्रे मिळालेली नाहीत. यामुळे दहावी,‎ बारावीतील खेळाडूंचे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे.विद्यार्थी खेळाडूंना या प्रमाणपत्राच्या‎ आधारे परीक्षेत ग्रेस गुण दिले जातात. पण प्रमाणपत्राअभावी ते‎ गुणांपासून वंचित राहण्याचा धोका‎ निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांची चिंता वाढली‎ आहे.‎ यावर्षी शालेय क्रीडा स्पर्धेच्या‎ नियोजनात गोंधळाची स्थिती होती.‎ खूपच विलंबाने शासनाने स्पर्धांना मंजुरी दिली. त्यानुसार सप्टेंबरनंतर त्या झाल्या.‎ शालेय, तालुका, जिल्हा व राज्यस्तरावर विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. जिल्हा स्तरावरून‎ विभागीय स्तरावर व पुढे राज्यस्तरावर स्पर्धा झाल्या. या स्पर्धा संपून वर्ष संपत आले, तरी यशस्वी झालेल्या व सहभाग घेतलेल्या‎ खेळाडूंना जिल्हा क्रीडाधिकारी‎ कार्यालयाकडून प्रमाणपत्रे मिळालेली नाहीत.बारावीच्या परीक्षा फेब्रुवारीमध्ये सुरू‎ होत आहेत. त्यानंतर दहावीच्याही होतील. त्यामुळे प्रमाणपत्र‎ तातडीने मिळण्याची गरज आहे. अन्यथा विद्यार्थी खेळाडू ग्रेस गुणांना‎ मूकण्याची भीती आहे. खेळाडूंना गुण‎ मिळण्यासाठी शाळांकडून परीक्षा मंडळाकडे प्रस्ताव वेळेत‎ सादर होणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रमाणपत्राची गरज आहे.

किती मिळतात गुण‎?सहावी ते दहावी किंवा‎ सहावी ते बारावीमधील खेळाडूला जिल्हास्तर प्रावीण्यासाठी ५ गुण मिळतात. विभागस्तर प्रावीण्यासाठी १०, राज्यस्तर प्रावीण्यासाठी १२ ते १५, राष्ट्रीयस्तर प्रावीण्यासाठी २० गुण मिळतात. आंतरराष्ट्रीय स्तरासाठी २५ गुण दिले जातात.

यामुळे झाला विलंब‎ !शालेय क्रीडा स्पर्धेच्या आयोजनाविषयी राष्ट्रीय पातळीवर पेच निर्माण‎ झाला, त्यामुळे स्पर्धा घेण्यास विलंब झाला. सर्व स्पर्धा एकाच वेळी सुरू‎ झाल्या. तालुका व जिल्हास्तरावरील स्पर्धा संपेपर्यंत विभागीय व राज्यस्तरीय स्पर्धांचे नियोजन सुरू झाले. त्यामुळे खेळाडूंना प्रमाणपत्र‎ वितरणास विलंब होत आहे.‎

टॅग्स :Sangliसांगलीexamपरीक्षाHSC / 12th Exam12वी परीक्षा