कोरोनाच्या भीतीने हृदयविकार, मेंदूज्वराने मायलेकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:20 IST2021-05-31T04:20:22+5:302021-05-31T04:20:22+5:30
रेठरे धरण येथील जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिवंगत आर. एस. पाटील यांचे कनिष्ठ पुत्र व ...

कोरोनाच्या भीतीने हृदयविकार, मेंदूज्वराने मायलेकाचा मृत्यू
रेठरे धरण येथील जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिवंगत आर. एस. पाटील यांचे कनिष्ठ पुत्र व वसंतदादा विकास सोसायटीचे व रामलिंग दूध संस्थेचे संचालक जयवंतराव पाटील यांना कोरोनाबाधा झाली. त्यांना कोरोनाची लक्षणे होती; परंतु त्याना जास्त त्रास नव्हता. त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते. मात्र, गावातील काही व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने त्यांनी कोरोनाचा धसका घेतला होता. त्या भीतीने रात्रीच्या सुमारास त्यांच्या छातीत दुखू लागल्यावर इस्लामपूर येथील रुग्णालयात नेत असताना तीव्र झटक्याने निधन झाले.
त्यांच्या निधनानंतर पत्नी, मुलगा, मुलगी व आई सुमन यादेखील बाधित झाल्या होत्या. आईचे वय जास्त असल्याने त्यांच्यावर कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. काही वर्षांपूर्वी थोरला मुलगा हणमंतराव यांचे अपघाती व पतीचे निधन झाले होते. आता लहान मुलगा जयवंतराव यांचेदेखील निधन झाल्याने त्या मानसिक तणावात होत्या. त्यातच त्यांचे मेंदूतील रक्तस्रावाने निधन झाले. अवघ्या दहा दिवसांत मायलेकरांचा मृत्यू झाला.