शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका कर्मचा-यांना भाजपच्या झेंड्याची भीती, अन्य पक्षांचे ध्वज, बॅनर हटविले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2018 20:02 IST

महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकातील कर्मचाºयांनी नुकतेच सांगलीतील विद्युत खांब व अन्य ठिकाणचे झेंडे, फलक व जळमटे काढून स्वच्छता मोहिमेअंतर्गत काम केले. मात्र या मोहिमेत त्यांनी अन्य सर्वच पक्षांचे झेंडे, फलक हटविताना भाजपच्या झेंड्यांना आणि फलकांना हातसुद्धा लावला नाही. इतकी भीती त्यांनी या झेंड्याबद्दल बाळगली होती. 

 सांगली - महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकातील कर्मचाºयांनी नुकतेच सांगलीतील विद्युत खांब व अन्य ठिकाणचे झेंडे, फलक व जळमटे काढून स्वच्छता मोहिमेअंतर्गत काम केले. मात्र या मोहिमेत त्यांनी अन्य सर्वच पक्षांचे झेंडे, फलक हटविताना भाजपच्या झेंड्यांना आणि फलकांना हातसुद्धा लावला नाही. इतकी भीती त्यांनी या झेंड्याबद्दल बाळगली होती. 

सांगलीच्या बापट बाल शाळेजवळील चौकात दुपारी महापालिकेचे कर्मचारी दाखल झाले. त्यांनी याठिकाणच्या विद्युत खांबांवरील फलक व झेंडे हटविण्यास सुरुवात केली. याठिकाणी मोठ्या प्रमाणावर झेंडे लागले होते. त्यात माकप व भाजपच्या झेंड्यांची संख्या अधिक होती. काही राजकीय पक्षांचे तसेच खासगी दुकानदारांचे, व्यावसायिकांचे फलकही लागले होते. कर्मचाºयांनी एका मोठ्या काठीने  माकपसहीत सर्व झेंडे व फलक काढून कच-यात टाकले, मात्र त्यांनी भाजपच्या झेंड्याला स्पर्शसुद्धा केला नाही. चार ते पाच नागरिकांनी त्याबद्दल कर्मचाºयांना जाब विचारला. त्यावर कर्मचारी गप्प राहिले. शेवटी वारंवार याबाबत विचारणा झाल्यानंतर तो कर्मचारी संतापला. ‘तुम्हाला दुसरे काही काम नाही का?’, असा सवाल करून तो पुढील मोहिमेस निघून गेला. चार-पाच नागरिकांनी महापालिकेच्या कर्मचाºयांचा हा अतिक्रमण हटविण्याच्या मोहिमेतील दुजाभाव प्रत्यक्ष पाहिला. त्यानंतर त्यांच्याच याविषयी चर्चाही झाली. महापालिकेच्या कर्मचाºयांनी निपक्षपातीपणे कारवाई केली पाहिजे, मात्र पक्षपातीपणे कारवाई करण्याची महापालिकेचे परंपरा जुनी आहे.  सत्ता कॉंग्रेसची, अभय भाजपलासांगली, मिरज, कुपवाड महापालिकेत सध्या कॉंग्रेसची सत्ता आहे. विरोधात राष्टÑवादी आणि वाभिमानी विकास आघाडी आहे. भाजपचे अस्तित्व महापालिकेत नगण्य आहे. तरीही कर्मचाºयांना भाजपला अभय द्यावेसे का वाटले, असा प्रश्न उपस्थित होत आहे. राज्यात आणि केंद्रात भाजपची सत्ता असल्यामुळे त्याचा प्रभाव महापालिकेतही दिसू लागला आहे.

टॅग्स :SangliसांगलीBJPभाजपा