मुलाने विष प्यायल्याने पित्याची आत्महत्या
By Admin | Updated: June 26, 2014 00:26 IST2014-06-26T00:23:33+5:302014-06-26T00:26:34+5:30
मालगाव : वारंवार भांडण

मुलाने विष प्यायल्याने पित्याची आत्महत्या
मिरज : भांडणात मुलाने विष प्राशन केल्याने मालगाव (ता. मिरज) येथील तातोबा गणपती जाधव ऊर्फ मिरजे (वय ५५) या पित्याने दोरीने गळफास लावून घेऊन आत्महत्या केली.
तातोबा जाधव मालगावमधील पाण्याच्या टाकीजवळ ग्रामपंचायतीच्या घरकुलात राहात होते. त्यांची पत्नी लक्ष्मीबाई हिने दोन वर्षांपूर्वी आत्महत्या केल्याने तातोबा एकटेच होते. सेंट्रिंग काम करणारे तातोबा जाधव यांना दारूचे व्यसन असल्यामुळे मुलगा राजू जाधव याच्यासोबत त्यांचे वारंवार भांडण होत असे.
मंगळवारी रात्री कामावरून आल्यानंतर तातोबा यांचे राजूसोबत भांडण झाले. वडिलांसोबत झालेल्या भांडणानंतर राजूने विष प्राशन केले. त्याला उपचारासाठी मिरजेच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मुलाने विष प्राशन केल्याने अस्वस्थ झालेल्या तातोबा जाधव यांनी पहाटेच्या सुमारास घरात दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. पित्याच्या मृत्युमुळे राजू जाधव यास रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले. याबाबत ग्रामीण पोलिसांत नोंद आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत. (वार्ताहर)