शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

अज्ञात डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार पिता-पुत्र ठार, गोटखिंडी फाट्याजवळ अपघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2022 15:33 IST

गोटखिंडी : पेठ- सांगली रस्त्यावरील गोटखिंडी (ता. वाळवा) फाट्याजवळील पुर्वेच्या वळणावर अज्ञात डंपरने दुचाकीस जोरदार धडक दिल्याने १३ वर्षाच्या ...

गोटखिंडी : पेठ-सांगली रस्त्यावरील गोटखिंडी (ता. वाळवा) फाट्याजवळील पुर्वेच्या वळणावर अज्ञात डंपरने दुचाकीस जोरदार धडक दिल्याने १३ वर्षाच्या मुलासह पिता जागीच ठार झाला. अंकुश शिवाजी साळुंखे (वय ४०) व आदित्य शिवाजी साळुंखे (१३, रा. हजारमाची, राजारामनगर, कऱ्हाड) अशी मृत पिता-पुत्राची नावे आहेत. अपघातात अंकुश यांची पत्नी सोनाली अंकुश साळुंखे (३६) गंभीर जखमी झाली आहे. हा अपघात आज, मंगळवारी सकाळच्या दरम्यान घडला. अपघातानंतर अज्ञात डंपरचालक वाहनासह पसार झाला.याबाबत माहिती अशी की, हजारमाची येथील बांधकाम व्यावसायिक असलेले अंकुश साळुंखे पत्नी साेनाली व मुलगा आदित्यसह सांगलीला नातेवाईकांकडे गेले हाेते. सकाळी ते दुचाकीवरुन (क्र. एमएच ५० आर १६७६) हजारवाडीकडे परतत हाेते. सकाळी नऊ वाजण्याच्या दरम्यान गाेटखिंडी फाट्याच्या पुर्वेकडील वळणावर समाेरुन भरधाव वेगाने आलेल्या डंपरने त्यांच्या दुचाकीस जाेरदार धडक दिली. अपघातात अंकुश व आदित्य जागीच ठार झाले.अपघात एवढा भीषण हाेता की अंकुश यांचे शीर शरिरापासून वेगळे होऊन धडक दिलेल्या वाहनाबरोबर गेले होते, तर आदित्य याच्याही डोक्यावरून वाहन गेल्याने त्याचेही डोके दिसत नव्हते. अपघातात दुचाकीवर मागे बसलेल्या अंकुश यांच्या पत्नी साेनाली गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना तात्काळ सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. अपघातानंतर अज्ञात डंपरचा चालक वाहनासह घटनास्थळावरुन पसार झाला.अपघाताची माहिती मिळताच आष्टा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित सिद व पथक घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले. परिसरातील सीसीटीव्हीच्या मदतीचे डंपरचालकाचा शाेध सुरु असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

दुचाकीचा चुराडा

घटनास्थळी विदारक चित्र हाेते. रस्त्यावर सर्वत्र रक्ताचा सडा पडला होता. डंपरच्या धडकेने अंकुश यांच्या दुचाकीचा चुराडा झाला होता. अपघातानंतर घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली हाेती.

पंधरा दिवसात दुसरा अपघातपंधरा दिवसांपूर्वी याच रस्त्यावर गोटखिंडी फाट्यापासून दोन किलाेमीटरवरील गाताडवाडी फाट्यावर झालेल्या अपघातात ओगलेवाडी येथील एकाच कुटुंबातील पाच जण ठार झाले होते. त्यानंतर मंगळवारी गोटखिंडी फाट्याजवळ हजारमाची (ओगलेवाडी) येथील पिता-पुत्र जागीच ठार झाले. पंधरा दिवसात झालेल्या या दुसऱ्या भीषण अपघाताची परिसरात चर्चा हाेती.

टॅग्स :SangliसांगलीAccidentअपघात