जुनेखेड येथे पत्नी व मुलाकडून बापाला चटके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:09 IST2021-01-13T05:09:15+5:302021-01-13T05:09:15+5:30

इस्लामपूर : जुनेखेड (ता. वाळवा) येथील ४२ वर्षीय वडिलांना मुलगा आणि त्याच्या आईने तापलेल्या उलथणीने अंगावर चटके देऊन जखमी ...

Father beaten by wife and child at Junekhed | जुनेखेड येथे पत्नी व मुलाकडून बापाला चटके

जुनेखेड येथे पत्नी व मुलाकडून बापाला चटके

इस्लामपूर : जुनेखेड (ता. वाळवा) येथील ४२ वर्षीय वडिलांना मुलगा आणि त्याच्या आईने तापलेल्या उलथणीने अंगावर चटके देऊन जखमी केल्याची घटना घडली. हा प्रकार ७ ते ९ जानेवारी या दरम्यान घडला. याबाबत जखमी वडिलाने रविवारी पोलिसांत फिर्याद दिली.

सयाजी मारुती पवार (वय ४२) असे फिर्यादीचे नाव आहे. पत्नी अश्विनी सयाजी पवार व मुलगा सत्यजित सयाजी पवार अशा दोघांविरुद्ध पोलिसांत गुन्हाची नोंद झाली आहे. सयाजी पवार हे ट्रकचालक म्हणून काम करतात. मुलगा सत्यजित याने त्यांचा विरोध डावलून सहाचाकी आणि दहाचाकी असे दोन ट्रक विकत घेतले होते. त्यावर सयाजी पवार हे चालक म्हणून जात होते. ३१ डिसेंबर रोजी त्यांनी जालना येथून कराड व ढेबेवाडी फाटा येथे सळी पोहोच करण्याचे भाडे घेतले. कराड येथे सळी टाकल्यानंतर ढेबेवाडी फाटा येथे न जाता सयाजी पवार यांनी ६ बंडल सळी वाघवाडी फाटा आणि रियालन्स पेट्रोल पंपाजवळील भंगारवाल्यांना विकली. या कारणावरून पत्नी व मुलाने त्यांना चटके दिले.

Web Title: Father beaten by wife and child at Junekhed