जाखापुरातील पिता-पुत्रांचा अपघातात मृत्यू

By Admin | Updated: June 5, 2014 00:13 IST2014-06-05T00:13:01+5:302014-06-05T00:13:24+5:30

दुचाकी व डंपरचा अपघात

Father and son die in Jakhapu accident | जाखापुरातील पिता-पुत्रांचा अपघातात मृत्यू

जाखापुरातील पिता-पुत्रांचा अपघातात मृत्यू

कुची : हातीद (ता. सांगोला) येथे झालेल्या दुचाकी व डंपरच्या अपघातात जाखापूर (ता. कवठेमहांकाळ) येथील पित्यासह दोन मुलांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. जाखापूर (ता. कवठेमहांकाळ) येथील कोळेकर दाम्पत्य दोन मुलांसह सोमवारी उदनवाडी (ता. सांगोला) येथे घरगुती कार्यक्रमासाठी गेले होते. परतताना हातीद (ता. सांगोला) येथे ते आले असता, कोळेकर यांच्या दुचाकीस डंपरने जोरदार धडक दिली. या अपघातात संदीपान बाळासाहेब कोळेकर (वय ३२), त्यांचे पुत्र विराज (३) व कुणाल (१) यांचा मृत्यू झाला. मनीषा कोळेकर या गंभीर जखमी झाल्या असून, त्यांच्यावर मिरज येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (वार्ताहर)

Web Title: Father and son die in Jakhapu accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.