फत्तेसिंगराव नाईक दुघ संघाची १०० कोटींची उलाढाल अभिनंदनीय : मानसिंगराव नाईक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:27 IST2021-09-19T04:27:32+5:302021-09-19T04:27:32+5:30

ओळ : बिऊर (ता. शिराळा) येथे फत्तेसिंगराव नाईक (आप्पा) सहकारी दूध संघाच्या सभेत आमदार मानसिंगराव नाईक यांनी मार्गदर्शन केले. ...

Fatehsingrao Naik Dugh Sangh's turnover of Rs 100 crore is commendable: Mansingrao Naik | फत्तेसिंगराव नाईक दुघ संघाची १०० कोटींची उलाढाल अभिनंदनीय : मानसिंगराव नाईक

फत्तेसिंगराव नाईक दुघ संघाची १०० कोटींची उलाढाल अभिनंदनीय : मानसिंगराव नाईक

ओळ : बिऊर (ता. शिराळा) येथे फत्तेसिंगराव नाईक (आप्पा) सहकारी दूध संघाच्या सभेत आमदार मानसिंगराव नाईक यांनी मार्गदर्शन केले. यावेळी अध्यक्ष अमरसिंह नाईक उपस्थित हाेते.

लोकमत न्यूज नेटवर्क

शिराळा : फत्तेसिंगराव नाईक सहकारी दूध उत्पादक संघाने वार्षिक १०० काटोची उलाढाल पूर्ण केली. ही संघाच्या व्यवस्थापनाची बाब अभिनंदनीय आहे. पुढील टप्पा पार करण्यासाठी मुंबई बाजारपेठ काबीज करा, असे प्रतिपादन विश्वास उधोग समूहाचे अध्यक्ष व विद्यमान आमदार मानसिंगराव नाईक यांनी केले.

बिऊर (ता. शिराळा) येथील फत्तेसिंगराव नाईक दूध उत्पादक संघाच्या ४४ व्या वार्षिक सर्व साधारण सभेमध्ये ते बाेलत हाेते. संघाचे अध्यक्ष अमरसिंह नाईक अध्यक्षस्थानी होते. आमदार नाईक म्हणाले, शेतकऱ्यांच्या हिताची जपणूक करणे त्यांना समृद्ध बनविणे, युवकांच्या हातास काम देणे, हे विश्वास उद्योग समूहाचे उद्दिष्ट आहे. कोरोना महामारीच्या साथीत दोन वर्षे सहकार क्षेत्रात, व्यवसायात फार वाईट दिवस हाेते. उत्पादित मालास विकी दरही चांगला मिळत नाही. अडचणीच्या काळात दूध उत्पादकांसाठी संघाने हिताचे निर्णय घेतले. मुक्त गोठा, वासरू संगोपन, अनुदान अशा सुविधा देत ताकतीने यश मिळवत पुढे जावे.

यावेळी संघातील कर्मचाऱ्यांच्या पाल्यांनी शैक्षणिक क्षेत्रात मिळवलेल्या विशेष प्रावीण्यबद्दल तसेच जास्तीत जास्त दूध पुरवठा करणाऱ्या दूध संघाला बक्षीस व सन्मानचिन्ह देऊन गाैरविण्यात आले.

संचालक एम. वाय. यमगर यांनी स्वागत केले. ठरावाचे वाचन सचिव जे. डी. साळुंखे यांनी केले. सर्व ठराव एकमताने मंजूर करण्यात आले.

याप्रसंगी संचालक बबन पाटील, व्यवस्थापक दिनकर नायकवडी यांनी मनोगत व्यक्त केले. संचालक अनिल पाटील यांनी आभार मानले. यावेळी जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विराज नाईक, पाटण दूध संघाचे अध्यक्ष अधिकराव पाटील, संघाचे उपाध्यक्ष प्रकाश धस, राजेंद्र काळे, कार्यकारी संचालक रवींद्र यादव, माणिक दशवंत, प्रदीप यादव उपस्थित होते.

Web Title: Fatehsingrao Naik Dugh Sangh's turnover of Rs 100 crore is commendable: Mansingrao Naik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.