शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

उपोषणकर्त्या महिलेची प्रकृती खालावली, मिरज-आरग मार्गावरील अतिक्रमणे हटविण्याची मागणी 

By श्रीनिवास नागे | Updated: June 22, 2023 18:33 IST

प्रांतांचे चौकशीचे आदेश, बांधकाम विभागाकडून नोटिसा !

मिरज : बेडग (ता. मिरज) येथील मिरज-आरग जिल्हा मार्गावरील अतिक्रमणे हटविण्यात यावीत, या मागणीसाठी मिरजेत सुरू असलेल्या आंदोलनातील एका उपोषणकर्त्या महिलेची प्रकृती खालावल्याने तिला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. वाद न मिटल्याने दुसऱ्या दिवशीही उपोषण सुरू होते.बेडग येथून जाणाऱ्या मिरज-आरग या जिल्हा मार्गालगत अनेक अतिक्रमणे वाढली आहेत. यामुळे वाहतुकीस अडथळा होऊन अपघात वाढल्याने ही अतिक्रमणे काढण्यात यावीत, या मागणीसाठी बेडग येथील शिवाजी कांबळे, रणजित कांबळे, प्रदीप भोसले, राहुल कांबळे, वासुदेव कांबळे, छाया कांबळे, अर्चना कांबळे, रेखा खाडे, अर्चना कांबळे यांनी मिरजेतील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. उपोषणकर्त्यांपैकी अर्चना सुनील कांबळे यांची प्रकृती खालावल्याने त्यांना उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.दुसऱ्या दिवशीही उपोषण सुरू होते. अतिक्रमण हटविण्याच्या भूमिकेवर उपोषणकर्ते ठाम आहेत. महेश कांबळे, सचिन कांबळे, तुषार खांडेकर यांच्यासह उपोषणाला पाठिंब्यासाठी आंबेडकरी चळवळीतील शेकडो महिला व कार्यकर्ते उपस्थित होते.प्रांतांचे चौकशीचे आदेश, बांधकाम विभागाकडून नोटिसा !उपोषणाची दखल घेऊन बांधकाम विभागाने रस्त्याच्या मध्यापासून १० मीटर अंतरावरील अतिक्रमण असलेल्यांना नोटिसा बजावल्या आहेत. २४ तासांत अतिक्रमणे हटविण्याची मुदत दिली आहे. रस्त्याच्या मध्यापासून ३० मीटर अंतरावरील बांधकामाबाबत प्रांताधिकारी उत्तम दिघे यांनी तहसीलदार व नगररचना विभागाला चौकशीचे आदेश दिले आहेत.

टॅग्स :Sangliसांगलीagitationआंदोलन