येडेमच्छिंद्र येथे जागेसाठी उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:23 IST2021-02-15T04:23:25+5:302021-02-15T04:23:25+5:30
शिरटे : येडेमच्छिंद्र (ता. वाळवा) येथील शेतजमिनीचा झालेला मुदत खरेदीचा व्यवहार हा बेकायदेशीर असून, तो रद्द होण्याबाबत वारंवार मागणी ...

येडेमच्छिंद्र येथे जागेसाठी उपोषण
शिरटे : येडेमच्छिंद्र (ता. वाळवा) येथील शेतजमिनीचा झालेला मुदत खरेदीचा व्यवहार हा बेकायदेशीर असून, तो रद्द होण्याबाबत वारंवार मागणी करूनही न्याय मिळत नाही. यामुळे सोमवार, दि. १५ पासून बेमुदत उपोषणास बसणार असल्याचे अर्जुन जगन्नाथ लोहार यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे जाहीर केले आहे. उपोषणातून न्याय न मिळाल्यास आत्मदहन करण्याचा इशाराही सुतार यांनी दिला आहे.
पत्रकात म्हटले आहे की, माझ्या शेतजमिनीचा मुदत खरेदीचा व्यवहार हा बेकायदेशीर असल्याबाबत मी १७ डिसेंबर २०२० रोजी संबंधित विभागाकडे तक्रार दाखल केली होती. माझ्या अर्जावर कोणतीच कार्यवाही झालेली नाही. त्यानंतर मी १ फेब्रुवारी २०२१ रोजी पुन्हा अर्ज दिले होते. वारंवार तक्रार अर्ज देऊनही लक्ष दिले जात नाही. यामुळे ग्रामपंचायत कार्यालयाजवळ बेमुदत उपोषणास बसणार आहे.