श्रावणातला उपवास महागला; शेंगदाणा, वरीच्या दरात किलोमागे २० रुपयांनी वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:31 IST2021-08-25T04:31:19+5:302021-08-25T04:31:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : श्रावणातल्या उपवासाला आता महागाईचे चटके बसत आहेत. मागणी वाढल्याने शेंगदाणा, वरीच्या दरात तब्बल २० ...

श्रावणातला उपवास महागला; शेंगदाणा, वरीच्या दरात किलोमागे २० रुपयांनी वाढ
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : श्रावणातल्या उपवासाला आता महागाईचे चटके बसत आहेत. मागणी वाढल्याने शेंगदाणा, वरीच्या दरात तब्बल २० रुपयांनी, तर शाबुदाणा दरात ५ रुपये वाढ झाली आहे. महिनाभर हे दर चढेच राहण्याची शक्यता आहे.
सणांचा महिना म्हणून श्रावणाची ओळख आहे. या महिन्यात विविध उपवास करण्याची परंपरा आहे. त्यामुळे उपवासाच्या पदार्थांना दरवर्षी श्रावणात मागणी वाढत असते. वाढणाऱ्या मागणीच्या तुलनेत उपलब्धता घटल्यानंतर दरांमध्ये वाढ होते. सध्या शेंगदाणा व वरीच्या बाबतीत अशीच स्थिती आहे. त्यामुळे श्रावणाच्या सुरुवातीलाच दोन्हींच्या दरात तब्बल २० रुपयांची वाढ दिसत आहे.
चौकट
असे वाढले दर प्रतिकिलो
पदार्थ श्रावणापूर्वी आताचे दर
शेंगदाणा ९०-११० १२०
वरी १०० १२०
चौकट
आवक घटली, मागणी वाढली
वरी
सध्या नाशिकसह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील वरीच्या पिकांचे उत्पादन घटले आहे.
मागणीच्या तुलनेत उत्पादन कमी असल्याने दरांच्या वाढीस ही परिस्थिती कारणीभूत ठरली आहे.
शेंगदाणा
देशातील शिल्लक असलेला शेंगदाणा आता संपत आला आहे. याशिवाय गुजरातमधील शेतकऱ्यांना दुसऱ्या पावसाची प्रतीक्षा आहे.
बाजारातील उपलब्धता घटत असल्याने व मागणीत वाढ झाल्याने शेंगदाणा दरात वाढ होत आहे.
चौकट
साबुदाणा दरात अल्प वाढ
सध्या साबुदाणा दरात पाच रुपयांची वाढ झाली आहे. गेल्या काही वर्षांचा विचार केल्यास यंदा साबुदाण्याला मागणी कमी आहे. त्यामुळे दरात फारशी वाढ दिसत नाही.
कोट
मागणीमध्ये वाढ
एकीकडे मागणी वाढत असताना वरी व शेंगदाणा पिकांचे उत्पादन घटण्याची चिन्हे आहेत. याशिवाय शिल्लक मालही संपत आला आहे. यामुळे दोन्हींच्या दरात २० रुपयांची वाढ झाली आहे.
- राजेश गाला, व्यापारी