तासगावात कस्तुरबा हॉस्पिटल दहा दिवसात सुरू न झाल्यास उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:32 IST2021-09-04T04:32:02+5:302021-09-04T04:32:02+5:30

तासगाव : येथील कस्तुरबा हॉस्पिटल एका महिन्यात सुरू करू, असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी देऊनही तीन महिन्यात त्याचे काम होत नाही. ...

Fasting if Kasturba Hospital in Tasgaon is not started in ten days | तासगावात कस्तुरबा हॉस्पिटल दहा दिवसात सुरू न झाल्यास उपोषण

तासगावात कस्तुरबा हॉस्पिटल दहा दिवसात सुरू न झाल्यास उपोषण

तासगाव : येथील कस्तुरबा हॉस्पिटल एका महिन्यात सुरू करू, असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी देऊनही तीन महिन्यात त्याचे काम होत नाही. येत्या दहा दिवसात काम पूर्ण न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा माहिती अधिकार जिल्हाध्यक्ष राहुल शिंदे यांनी दिला आहे.

याविषयी दिलेल्या निवेदनात त्यांनी सांगितले की, १ मे रोजी पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिलेल्या आदेशानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी महिन्यात तासगावचे कस्तुरबा हॉस्पिटल चालू करू, असे आश्वासन दिले होते. परंतु, गेले तीन महिने कोविड हॉस्पिटल चालू झाले नसून, नगरपालिका व जिल्हा प्रशासनाने खासगीकरणाचा घाट घातला आहे. यामुळे गोरगरीब जनतेची लूट होणार असून, कस्तुरबा हॉस्पिटल तत्काळ मिरज वैद्यकीय हॉस्पिटलच्या ताब्यात द्यावे व कोविड हॉस्पिटल सुरु करावे. हॉस्पिटल सुरू न केल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

Web Title: Fasting if Kasturba Hospital in Tasgaon is not started in ten days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.