चितळे महाविद्यालयात फॅशन डिझायनिंग कोर्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:31 IST2021-09-17T04:31:49+5:302021-09-17T04:31:49+5:30
भिलवडी : भिलवडी शिक्षण संस्थेच्या बाबासाहेब चितळे महाविद्यालयात फॅशन डिझायनिंग कोर्स सुरू करण्यात आला. या कोर्सचे उद्घाटन अनघा चितळे ...

चितळे महाविद्यालयात फॅशन डिझायनिंग कोर्स
भिलवडी : भिलवडी शिक्षण संस्थेच्या बाबासाहेब चितळे महाविद्यालयात फॅशन डिझायनिंग कोर्स सुरू करण्यात आला. या कोर्सचे उद्घाटन अनघा चितळे यांच्याहस्ते करण्यात आले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये सर्वाधिक कलागुण व कष्ट करण्याची जिद्द असते. भिलवडी परिसरातील महाविद्यालयीन विद्यार्थी फॅशन डिझायनिंग क्षेत्रात वेगळा ठसा उमटवतील, असे प्रतिपादन अनघा चितळे यांनी व्यक्त केले.
अनघा चितळे यांनी दोन उत्तम प्रकारच्या एमब्रॉयडरी मशिन महाविद्यालयाच्या स्त्री समुपदेशन केंद्रास भेट देणार असल्याचे जाहीर केले. केंद्र समन्वयक डॉ. एन. एस. गायकवाड यांनी गेल्या वीस वर्षांतील स्त्री समुपदेशन केंद्राच्या कार्याचा आढावा घेतला. या वेळी संस्था सचिव एस. एन. कुलकर्णी, प्राचार्य डॉ. दीपक देशपांडे, मानसिंग हाके, अभ्यासक्रम प्रशिक्षका शकुंतला पाटील, विज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. डी. एस. मोकाशी तसेच कला व विज्ञान विभागाचे प्राध्यापक, सेवक व विद्यार्थी उपस्थित होते.