तांदूळवाडी परिसरातील शेतकरी चिंतित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:17 IST2021-06-30T04:17:36+5:302021-06-30T04:17:36+5:30
तांदूळवाडी : तांदूळवाडी (ता. वाळवा) परिसरात पावसाने विश्रांती घेतल्याने शेतात चांगली आलेली पिके वाया जातात की काय, या चिंतेत ...

तांदूळवाडी परिसरातील शेतकरी चिंतित
तांदूळवाडी : तांदूळवाडी (ता. वाळवा) परिसरात पावसाने विश्रांती घेतल्याने शेतात चांगली आलेली पिके वाया जातात की काय, या चिंतेत शेतकरी दिसत आहेत.
तांदूळवाडी, कुंडलवाडी, मालेवाडी, बहादूरवाडी, कोरेगाव, भडकंबे, नागाव, कणेगाव, भरतवाडी आदी गावांतील शेतकऱ्यांनी मे महिन्यात मशागतीची कामे पूर्ण केली आहेत. पेरणी व टोकणीसाठी पावसाची प्रतीक्षा करत असताना जून महिन्याच्या प्रारंभी पावसाने जोरदार हजेरी लावली. हा पाऊस सलग चार ते पाच दिवस पडला. यामुळे शेतकऱ्यांनी शेतात भात पेरणी, भुईमूग, सोयाबीन टोकणी, आडसाली उसाची लागवड पूर्ण केली आहे. त्या पावसाच्या ओलाव्यावर आतापर्यंत पिके चांगली आलेली आहे; पण गेले आठ दिवस झाले कडक उन्हाळा सुरू झाला आहे. यामुळे शेतकरी चिंतित झाले आहेत.