तांदूळवाडी परिसरातील शेतकऱ्यांना वळीव पावसाची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:27 IST2021-04-07T04:27:48+5:302021-04-07T04:27:48+5:30
तांदूळवाडी : तांदूळवाडी (ता. वाळवा) परिसरात कुंडलवाडी, मालेवाडी, कणेगाव, बहादूरवाडी आदी गावे येत असून, या गावांमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी आडसाली ...

तांदूळवाडी परिसरातील शेतकऱ्यांना वळीव पावसाची प्रतीक्षा
तांदूळवाडी : तांदूळवाडी (ता. वाळवा) परिसरात कुंडलवाडी, मालेवाडी, कणेगाव, बहादूरवाडी आदी गावे येत असून, या गावांमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी आडसाली उसाची लागवड केली होती. येथील पिकांची काढणी केलेल्या शेतीचे मशागत करणे गरजेचे असल्याने त्यासाठी वळीव पावसाची आवश्यकता आहे. एप्रिल सुरू झाला आहे. यादरम्यान वळीव पावसाची हजेरी लागणे गरजेचे आहे. तेव्हाच शेतकऱ्यांच्या शेतातील मशागतीची कामे गतीने सुरू होतील. त्यामुळे सध्या गहू, हरभरा, काढणीचे काम पूर्ण केली जात असल्याचे दिसत आहे. वळीव पावसाची प्रतीक्षा मात्र कायम आहे. याचबरोबर सध्या जाणवणारा कडक उन्हाळा सकाळपासूनच सूर्य उष्णता आग ओकत आहे. लोकांना घरातून बाहेर पडताना विचार करत बाहेर पडावे लागत आहे. त्यातच कोरोनासारख्या महाभयंकर विषाणूने पुन्हा तोंड बाहेर काढले आहे. त्यामुळे सरकारने मिनी लॉकडाऊन सुरू केला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांसह अन्य लोकांची धावपळ सुरू झाली आहे.