शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
2
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
3
Top Marathi News LIVE Updates: भोंदू खरात प्रकरणी ईडीची मोठी कारवाई; ११ ठिकाणी टाकली धाड, मालमत्तेची चौकशी
4
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
5
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
6
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
7
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
8
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
9
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
10
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
11
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
12
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
13
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
14
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
15
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
16
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
17
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
18
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
19
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
20
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: तिसंगीतील शक्तिपीठ महामार्ग मोजणी रोखली; पुन्हा आलात, तर हातात दगडे असतील, शेतकऱ्यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 19:02 IST

'महामार्गासाठी आम्ही एक इंचही जमीन देणार नाही'

कवठेमहांकाळ : तिसंगी (ता. कवठेमहांकाळ) येथे नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना सोमवारी पुन्हा एकदा बाधित शेतकऱ्यांचा रोष सहन करावा लागला. “या महामार्गासाठी आम्ही एक इंचही जमीन देणार नाही. पुन्हा मोजणीला आलात, तर शेतकऱ्यांच्या हातात दगडे दिसतील,” असा इशारा देत शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना हाकलून लावले.गेल्या दीड वर्षांपासून शेतकरी कामगार पक्षाच्या लाल झेंड्याखालील नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समिती या प्रकल्पाच्या विरोधात आंदोलन करत आहे. या चळवळीचे नेतृत्व भाई दिगंबर कांबळे करीत आहेत. शेतकऱ्यांनी आतापर्यंत पाच-सहा वेळा मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना अडवून परत पाठविले आहे. आज पुन्हा आलेल्या पथकाला शेतात प्रवेश नाकारण्यात आला. “रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्ग आधीच अस्तित्वात आहे, मग समांतर नवीन महामार्गाची काय गरज? हजारो एकर बागायती शेती उद्ध्वस्त करून शासन कोणाचा विकास करणार आहे?” असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला.यावेळी दिगंबर कांबळे, वामन कदम, शिवाजी शिंदे, जगदीश पोळ, नागेश कोरे, सौरभ कदम, रत्नाकर वठारे, सुरेश कुंभार, दादा कुंभार, शिवाजी भोसले, संग्राम शिंदे, सागर शिंदे, प्रवीण कोळी, संपत कोळी, बाळू कोळी, शिवाजी कोळी, बाजीराव जाधव, बाळू कदम, दिलीप डुबुले, उल्हास पाटील, शंकर सुतार, किशोर खराडे, अविनाश खराडे, नागेश शिंदे, मनोज जाधव, सुशीला जाधव आदी शेतकरी उपस्थित होते.शेतकऱ्यांनी दर्शविला वावरात पाय ठेवण्यास विरोधपूर्वी झालेल्या पंचनाम्यात तहसीलदारांनी बाधीत शेतकऱ्यांची नकारात्मक भूमिका नोंदविली होती आणि “आम्ही पुन्हा मोजणीसाठी येणार नाही,” असे सांगितले होते. मात्र, वारंवार मोजणीसाठी येऊन प्रशासन शेतकऱ्यांना छळत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. आजच्या घटनेवेळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात होता. तरीदेखील तिसंगीतील सर्व शेतकरी एकजुटीने उभे राहून अधिकाऱ्यांना वावरात पाय ठेवू दिला नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : Farmers Halt Highway Survey in Sangli, Threaten Officials

Web Summary : Sangli farmers halted a highway survey, protesting land acquisition for the Nagpur-Goa Shaktipeeth route. They warned officials of resistance if surveying resumed, opposing the project's impact on fertile land. Farmers question the need for a new highway when one already exists.