शेतकऱ्यांनी शेतीमध्ये नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:47 IST2021-02-06T04:47:00+5:302021-02-06T04:47:00+5:30

ऐतवडे बुद्रुक : नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांनी शेती करणे गरजेचे आहे. त्याचाच एक भाग म्हणून शेतकरी मंडळ स्थापन ...

Farmers should use new technology in agriculture | शेतकऱ्यांनी शेतीमध्ये नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा

शेतकऱ्यांनी शेतीमध्ये नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा

ऐतवडे बुद्रुक : नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांनी शेती करणे गरजेचे आहे. त्याचाच एक भाग म्हणून शेतकरी मंडळ स्थापन करून शेती केली तर शेतीचा दर्जा सुधारेल, असे मत युवा नेते प्रतीक पाटील यांनी व्यक्त केले.

ऐतवडे बुद्रुक (ता. वाळवा) येथे लोकनेते राजारामबापू पाटील स्वयंसहाय्यता शेतकरी गट नोंदणी प्रमाणपत्र प्रदान कार्यक्रमात ते बोलत होते. प्रतीक पाटील म्हणाले, शेतकऱ्यांनी शेतीमध्ये नवीन नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा. ठिबक सिंचन, ड्रोनद्वारे फवारणी, शेतकरी मंडळ यांचा वापर करून अधिकाधिक उत्पन्न मिळविण्यासाठी प्रयत्न करावे. ऐतवडे बुद्रुक येथे आमदार मोहनराव कदम यांच्या फंडातून व जिल्हा वार्षिक योजनेतून कावखडी फाटा येथे नवीन वीज ट्रान्स्फर बसविण्याचा प्रारंभ करण्यात आला व महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतून पोलीस पाटील पाणंद रस्त्याच्या कामाचा प्रारंभ यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी डॉ. जितेश कदम, पंचायत समिती सदस्य धनश्री माने, सरपंच प्रतिभा बुद्रुक, राजारामबापू बँकेचे संचालक शहाजी गायकवाड, उपसरपंच अशोक दिंडे, माजी उपसरपंच सौरभ पाटील, डॉ. धनंजय माने, वर्धमान बुद्रुक, संग्राम गायकवाड, रावसाहेब पाटील उपस्थित होते.

फोटो -०४०२२०२१-आयएसएलएम-ऐतवडे बुद्रुक न्यूज

ऐतवडे बुद्रुक येथे विविध विकासकामांचा प्रारंभ प्रतीक पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सरपंच प्रतिभा बुद्रुक, शहाजी गायकवाड, अशोक दिंडे, सौरभ पाटील उपस्थित होते.

Web Title: Farmers should use new technology in agriculture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.