शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:47 IST2021-02-06T04:47:22+5:302021-02-06T04:47:22+5:30
पेठ (ता. वाळवा) येथे राजारामबापू पाटील कारखान्यामार्फत उच्च तंत्रज्ञान गटशेती व ठिबक सिंचन योजना राबविण्यासाठी शेतकरी परिसंवाद घेण्यात आला. ...

शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा
पेठ (ता. वाळवा) येथे राजारामबापू पाटील कारखान्यामार्फत उच्च तंत्रज्ञान गटशेती व ठिबक सिंचन योजना राबविण्यासाठी शेतकरी परिसंवाद घेण्यात आला. यावेळी प्रतिक पाटील बोलत होते.
कृषी अधिकारी नमदाडे म्हणाले, शेतात कमी पाण्यात जास्त उत्पादन घेण्याच्या दृष्टीने व शेतातील पिकावर ड्रोनच्या माध्यमातून औषध फवारणी करणे सोपे व सोईचे आहे.
यावेळी पंचायत समिती सदस्य देवराज पाटील, राजारामबापू कारखान्याचे संचालक आनंदराव पाटील, पंचायत समिती सदस्य शंकर चव्हाण, अदिती उद्योगचे पृथ्वीराज पाटील, जगन्नाथ नांगरे, संदेश पाटील, घबकवाडीचे सरपंच संजय कदम, विनायक कदम, उपसरपंच प्रमोद कदम, बालाजी पाटील, अनिल सांडगे, महादेव पाटील, राजेंद्र पाटील आदी उपस्थित होते.
चौकट
पन्नास शेतकऱ्यांचा गट
इस्राएल येथील शेतकऱ्यांना तेथील बँका शेतात जाऊन कर्ज देत आहेत. तेथीलच तंत्रज्ञान आपल्या भागातील शेतकऱ्यांना आम्ही देण्याचा प्रयत्न करीत आहे. ५० एकरचे शेतकऱ्यांचे गट करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे प्रतिक पाटील म्हणाले.