शेतकऱ्यांनी शेणखत हिरवळीच्या खताची निर्मिती करावी : दिलीप खंबे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:23 IST2021-03-20T04:23:58+5:302021-03-20T04:23:58+5:30
ऐतवडे बुद्रुक : लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांनी शेणखत हिरवळीच्या खताची निर्मिती करावी व त्यातून सेंद्रिय शेती फुलवावी, असे आवाहन ...

शेतकऱ्यांनी शेणखत हिरवळीच्या खताची निर्मिती करावी : दिलीप खंबे
ऐतवडे बुद्रुक : लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांनी शेणखत हिरवळीच्या खताची निर्मिती करावी व त्यातून सेंद्रिय शेती फुलवावी, असे आवाहन लक्ष्मी उद्योग समूहाचे संस्थापक दिलीप खंबे यांनी केले आहे.
चिकुर्डे (ता. वाळवा) येथे संत सावता माळी रयत बाजार शेतकरी व ग्राहक सुविधा केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. दिलीप खांबे म्हणाले, रासायनिक खतांचा वाढता दर व त्यामुळे निर्माण होणारे दुष्परिणाम यामुळे आज सेंद्रिय खतांची गरज आहे. त्याचबरोबर पशुधन घटत असल्यामुळे शेणखताचाही तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी हिरवळीच्या खताकडे वळणे गरजेचे आहे.
कार्यक्रमास श्रीनिवास बागल, वसंत बागल, राहुल डोईजड, प्रकाश विभुते, परमेश परीट, बसवेश्वर तोडकर, संपत मलगुंडे, विविध संस्थांचे पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.