शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये : प्रतीकसागर
By Admin | Updated: January 15, 2015 23:21 IST2015-01-15T23:02:42+5:302015-01-15T23:21:51+5:30
शिक्षकांनी स्वत: सहा तास अभ्यास केला पाहिजे. जीव लावून शिकविले पाहिजे. तरच विवेकानंदांसारखे आदर्श देशाला मिळतील. कोणतेही काम लहान नसते.

शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये : प्रतीकसागर
कवठेएकंद : सारे दिवस एकसारखे नसतात. दु:खामागून सुख डोकावत असते. मानवी जीवन हे महान जीवन मिळाले आहे. कठीण प्रसंगांना सामोरे जावा, असे आवाहन क्रांतिवीर मुनिश्री १0८ प्रतीकसागरजी महाराज यांनी केले.कवठेएकंद येथे समस्त जैन समाजबांधवांच्या पुढाकाराने आयोजित सर्वधर्म सत्संग महोत्सवप्रसंगी समारोप सभांच्या प्रवचनादरम्यान मुनिश्री प्रतीकसागरजी बोलत होते. ते म्हणाले, शेतकऱ्यांनो आत्महत्या करु नका. कितीही बिकट परिस्थिती आली तरी, हिंमत सोडू नका. जीवनात नक्कीच आनंदमय होईल. संघर्ष म्हणजे जीवन आहे. शालेय विद्यार्थ्यांना चांगल्या मोठ्या शाळेत दाखल केले म्हणजे तो मोठा माणूस होईल, हा समज चुकीचा आहे. त्याच्यामध्ये पात्रता निर्माण करा, तरच तो मोठा आदर्शवत माणूस बनू शकतो. आता बच्चे अधिक हुशार आहेत. त्यांना मार्गदर्शनाची गरज आहे. शिक्षकांनी स्वत: सहा तास अभ्यास केला पाहिजे. जीव लावून शिकविले पाहिजे. तरच विवेकानंदांसारखे आदर्श देशाला मिळतील. कोणतेही काम लहान नसते. आपला समज चुकीचा आहे. बेरोजगारी ही समस्या हिंमत आणि आत्मविश्वास कमी असणाऱ्यांमध्ये आहे. कामाची तयारी ठेवा, फळ मिळणार आहे. असेही त्यांनी सांगितले. (वार्ताहर)