शेतकऱ्यांनी आधुनिक पीक पद्धतीचा अवलंब करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:48 IST2021-03-13T04:48:55+5:302021-03-13T04:48:55+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क विटा : आमदार अनिल बाबर यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याने टेंभू योजनेचे पाणी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचत आहे. ...

शेतकऱ्यांनी आधुनिक पीक पद्धतीचा अवलंब करावा
लोकमत न्यूज नेटवर्क
विटा : आमदार अनिल बाबर यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याने टेंभू योजनेचे पाणी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचत आहे. त्यामुळे आगामी काळात शेतकऱ्यांनी परंपरागत शेती व्यवसाय बाजूला ठेवून टेंभूच्या पाण्याचा वापर करीत आधुनिक पीक पद्धतीचा अवलंब करावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर यांनी केले.
विटा येथे आ. अनिल बाबर यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून उभारण्यात येणाऱ्या बंधाऱ्याचे भूमिपूजन माजी उपाध्यक्ष सुहास बाबर यांच्याहस्ते झाले.
यावेळी नगरसेवक अमर शितोळे, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख अॅड. मिलिंद कदम, शिवसेनेचे विटा शहरप्रमुख सुधीर ऊर्फ राजू जाधव उपस्थित होते.
सुहास बाबर म्हणाले, विट्यात यंत्रमाग व पोल्ट्री हा मुख्य व्यवसाय आहे; परंतु सध्या हे दोन्ही व्यवसाय मंदीतून जात आहेत. त्यास पूरक व्यवसाय म्हणून शेती हा उत्तम पर्याय आहे. टेंभूचे पाणी शेतकऱ्यांच्या बांधावर असेल आणि योग्य नियोजन केले तर शेतीतून हमखास फायदा मिळू शकतो.
या कार्यक्रमास प्रकाश गायकवाड, मुरलीधर गायकवाड, ज्ञानेश्वर गायकवाड, समीर कदम, दत्तात्रय गायकवाड, अनिल हराळे, अंकुश हराळे, शिवाजी भोसले, सतीश हराळे, अक्षय गायकवाड, सुभाष गायकवाड, खंडू गायकवाड, किरण जाधव, सुनील मेटकरी, विजय गायकवाड, अधिक गायकवाड, संपत कदम, रणजित जाधव यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.