शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँका विलीन झाल्यास शेतकऱ्यांची फरफट, शेतकरी संघटना म्हणतात..

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2022 13:42 IST

राज्यातील जिल्हा बँका राज्य बँकेत विलीनीकरण करायच्या की त्यांची त्रिस्तरीय रचना कायम ठेवायची याबाबत केंद्र शासनाने अभ्यास गट नियुक्त केला आहे.

सांगली : राज्यातील जिल्हा बँका राज्य बँकेत विलीनीकरण करायच्या की त्यांची त्रिस्तरीय रचना कायम ठेवायची याबाबत केंद्र शासनाने अभ्यास गट नियुक्त केला आहे. त्यानंतर सहकार क्षेत्रात यावरील चर्चेने जोर धरला आहे. सहकारी बँकिंग क्षेत्रातील आजी, माजी पदाधिकारी व तज्ज्ञांच्या मते जिल्हा बँकांचे विलीनीकरण झाल्यास सामान्य शेतकरी व नागरिकांची फरफट होणार आहे. दुसरीकडे शेतकरी संघटनांनी यातील राजकीय संचालक मंडळ हटविण्याची मागणी केली आहे.

जिल्हा बँकेतील राजकीय मंडळींना हटविले पाहिजे. जिल्हा बँकांचे विलीनीकरण झाल्यास काहीही तोटा होणार नाही. शेतकऱ्यांना किंवा सोसायट्यांना थेट राज्य बँकांकडून कर्जवितरण झाल्यास व्याजदरही घटेल. यात शेतकऱ्यांचा फायदा आहे.  - महेश खराडे, स्वाभिमानी शेतकरी संघटना

सध्याच्या त्रिस्तरीय रचनेतून साेसायट्यांना हटवून त्यांचे सभासद जिल्हा बँकेला जोडावेत. जिल्हा बँका व राज्य बँक अशी द्विस्तरीय रचना असावी. जिल्हा बँकेतील राजकीय संचालक मंडळ दूर करून केवळ प्रशासकीय स्तरावर जिल्हा बँकांचे अस्तित्व राहिल्यास शेतकरी व सामान्यांचे हित साधले जाईल. - संजय कोले, राज्यप्रमुख शेतकरी संघटना सहकार आघाडी

प्रत्येक जिल्ह्यातील परिस्थिती वेगळी असते. राज्याच्या एका ठिकाणाहून बसून अन्य जिल्ह्यांबाबत विचार करणे चुकीचे आहे. जिल्हा बँकांमुळे सामान्य शेतकऱ्यांना मोठा आधार मिळतो. त्यामुळे या बँकांना अधिक सक्षम करण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न व्हायला हवेत. विलीनीकरणाची चर्चा चुकीची आहे. - आ. मानसिंगराव नाईक, अध्यक्ष, सांगली जिल्हा बँक

जिल्हा बँकेच्या मुख्य शाखांचे विलीनीकरण केल्यास हरकत नाही, पण सोसायट्या, तालुकास्तरीय बँक व राज्य बँक अशी त्रिस्तरीय रचना करायला हवी. पूर्णत: जिल्हा बँकांचे विलीनीकरण केल्यास तालुकास्तरीय बँकांचे अस्तित्वही संपुष्टात येईल. त्यामुळे कर्जवितरणाची यंत्रणा विस्कळीत होईल. कर्जप्रस्ताव घेऊन मग साेसायट्यांनी जायचे कुठे?  - विलासराव जगताप, माजी अध्यक्ष, सांगली जिल्हा बँक

टॅग्स :Sangliसांगलीbankबँक