शेतकऱ्यांनो, पिकविण्यापेक्षा विकायला शिका!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:15 IST2021-02-20T05:15:45+5:302021-02-20T05:15:45+5:30
क्रांतिसिंह नाना पाटील सेवाभावी संस्थेच्यावतीने स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी शिवार कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. यावेळी आमदार सुमन ...

शेतकऱ्यांनो, पिकविण्यापेक्षा विकायला शिका!
क्रांतिसिंह नाना पाटील सेवाभावी संस्थेच्यावतीने स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी शिवार कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. यावेळी आमदार सुमन पाटील, संभाजी ब्रिगेडचे श्रीमंत कोकाटे, उद्योजक प्रतापशेठ साळुंखे, संदीप राजोबा यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
राजू शेट्टी म्हणाले, शेती कायम तोट्याची, तरीही शेतकरी या मातीशी कधी बेईमान होत नाही. बाजारपेठ, रोगराई, बदलते वातावरण, कामगार, कर्ज यांसह अनेक प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहेत. मात्र बदलत्या काळानुसार आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरणे गरजेचे आहे.
महेश खराडे म्हणाले की, शिवार हे कृषी प्रदर्शन शेतकरी व शेतकऱ्यांसाठी गेली सहा वर्षे भरवत आहे. नवे तंत्रज्ञान मिळावे, या हेतूनेच याचे आयोजन केले आहे.
या प्रदर्शनात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे स्टॉल मांडण्यात आले आहेत. यात खते, बी, बियाणे, औषधे, अवजारे, ट्रॅक्टर यांचा समावेश आहे .याशिवाय विविध कंपन्यांची वाहने आहेत. गृहोपयोगी वस्तूंचेही स्टॉल सहभागी आहेत. तांदूळ महोत्सवाचेही आयोजन केले आहे. तसेच प्रगतशील शेतकऱ्यांना पुरस्कार व पशुपक्षी प्रदर्शनही आयोजित केले आहे.
यावेळी गुलाबराव यादव, महेश जगताप, सचिन पाटील, संजय बेले, भागवत यादव, अशोक खाडे, जोतिराम जाधव, शशिकांत माने उपस्थित होते.
चौकट.
आज डॉग शो; उदया पशू प्रदर्शन
शुक्रवार, दि. १९ फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ ते पाच यावेळेत डॉग शोचे आयोजन केले आहे. शनिवार, दि. २० रोजी सकाळी नऊ ते पाच या वेळेत पशू प्रदर्शन होणार आहे. यामध्ये देशी, होस्टन आदी जनावरांचा समावेश आहे.
फोटो-१८तासगाव१