सांगली : शक्तिपीठ महामार्ग रद्द करा, या मागणीवर सांगली जिल्ह्यातील शेतकरी ठाम आहेत. शेतकऱ्यांचा विरोध मोडून काढण्यासाठी सरकारने गावोगावी संवाददूत पाठवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार शुक्रवारी तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील गावांमध्ये संवादासाठी आलेल्या शेतकऱ्यांना संवाददुतांना शेतकऱ्यांनी पळवून आवले.कवठेमहांकाळ तालुक्यातील घाटनांद्रे, तिसंगी, तासगाव तालुक्यातील डोंगरसोनी, अंजनी, सावळज, सिद्धेवाडी, गव्हाण, वज्रचौंडी, मणेराजुरी, सावर्डे येथून शक्तिपीठ महामार्ग प्रस्तावित आहे. या गावांमध्ये शुक्रवारी संवाददुतांमार्फ शेतकऱ्यांशी चर्चा होणार होती. पण, शेतकऱ्यांनी संवाददुतांची भूमिका जाणून घेण्यापूर्वीच शेतकऱ्यांनी संवाददूत आणि अधिकाऱ्यांना तेथून पळवून लावले.शक्तिपीठ महामार्ग शेती बचाव कृती समितीचे उमेश देशमुख म्हणाले, कोणाचेतरी स्वप्न पूर्ण करण्याकरिता सरकार शक्तिपीठचा घाट घालत आहे. जिल्ह्यातील शेतकरी अशी हुकूमशाही प्रवृत्ती चालू देणार नाही. हे शेतकऱ्यांनी दाखवून दिले आहे. शक्तिपीठमुळे शेतकऱ्यांचे, शेतीचे आणि पर्यावरणाचे फार मोठे नुकसान होणार आहे.सांगली परिसरातील गावांना महापुराचा धोका वाढणार आहे. शेतकऱ्यांच्या पुढील अनेक पिढ्यांचे नुकसान होणार आहे. हे सरकारला अनेक वेळा सांगून देखील मुख्यमंत्री आणि त्यांचे सरकार आपला हट्ट सोडायला तयार नाही. म्हणून आम्हीही कोणतीही चर्चा करणार नाही. आमची लढाई आमच्या गावात आणि शेतात राहील. त्याचा पहिला हिसका शुक्रवारी गावात आलेल्या अधिकाऱ्यांना दाखवला आहे. पुढेही दाखवू, पण महामार्ग होऊ देणार नाही. आमची शेती वाचवू, त्यासाठी रक्त सांडायची देखील तयारी आमची आहे.यावेळी उमेश देशमुख, सतीश साखळकर, महेश खराडे, प्रभाकर तोडकर, उमेश एडके, प्रवीण पाटील, यशवंत हारूगडे, सुनील पवार, सुधाकर पाटील आदी उपस्थित होते.
Shaktipeeth Highway: संवादासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना सांगलीतील शेतकऱ्यांनी पळवून लावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2025 15:41 IST