शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

‘शक्तिपीठ’च्या प्रतिकृतीची शेतकऱ्यांकडून होळी

By अशोक डोंबाळे | Updated: March 14, 2025 18:27 IST

महामार्ग बाधित शेती बचाव कृती समितीकडून आंदोलन : शासनाविरोधात जोरदार घोषणा

अशोक डोंबाळे, लोकमत न्यूज नेटवर्क, सांगली : शेतकऱ्यांचा विरोध असतानाही राज्य शासनाने शक्तिपीठ महामार्ग शेतकऱ्यांवर लादला आहे. या घटनेच्या निषेधार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वाकांक्षी शक्तिपीठ महामार्गाच्या प्रतिकृतीची गुरुवारी सांगलीतील शेतकऱ्यांनी होळी केली. तसेच राज्य सरकारच्या शेतकरीविरोधी भूमिकेचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. महामार्गाला आम्ही जमीन देणार नाही, अशी आक्रमक भूमिकाही शेतकऱ्यांनी सांगितली.

शक्तिपीठ महामार्ग बाधित शेती बचाव कृती समितीचे नेते आणि अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष उमेश देशमुख, स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे, नागरिक जागृती मंचाचे अध्यक्ष सतीश साखळकर, प्रभाकर तोडकर, सुनील पवार, उमेश एडके, प्रवीण पाटील, यशवंत हारुगडे, रघुनाथ पाटील, सुधाकर पाटील आदींच्या नेतृत्वाखाली सांगलीत आंदोलन करण्यात आले.उमेश देशमुख म्हणाले, आम्ही होळीनिमित्त सण साजरा करण्याचे ठरवले होते. पण ती होळी आहे, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या निषेधाची. मुंबईत हजारो शेतकऱ्यांनी मोर्चा काढला होता. विरोधी पक्षांनी शक्तिपीठ महामार्गावर स्थगन प्रस्तावही आणला होता. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपला आग्रह सोडायला तयार नाहीत. त्यामुळे पुढे आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आम्ही शेतकऱ्यांच्या घरादारावरून नांगर फिरवणाऱ्या शक्तिपीठ महामार्गाच्या प्रतिकृतीची होळी करून होळी साजरी केली आहे.

शक्तिपीठ महामार्ग रद्दशिवाय थांबणार नाही : महेश खराडेशक्तिपीठ महामार्ग शेतकऱ्यांना नको असून हा महामार्ग अनेक देवस्थानाजवळूनही जात नाही. सध्या रत्नागिरी ते नागपूर महामार्ग शक्तिपीठ महामार्गाच्या जवळूनच जात आहे. असे असताना शेतकऱ्यांचा संसार उद्ध्वस्त करणाऱ्या शक्तिपीठ महामार्गासाठी मुख्यमंत्री फडणवीस हट्ट का धरत आहेत, असा सवाल स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी उपस्थित केला.

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरी