पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना काळे फासण्याचा शेतकरी संघटनेचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2020 01:10 PM2020-03-13T13:10:41+5:302020-03-13T13:12:08+5:30

संबधित खात्याचे डाँक्टरांचेही जाणिवपुर्वक दुर्लक्ष चालू आहे तरी पुरेशे डाँक्टरांची संख्या नसल्याने व नेमून दिलेल्या ठिकाणी पशुवैद्यकीय आधिकारी निवासांच्या ठिकाणी राहत नाहीत त्यामुळे सर्वच ठिकाणी उपचार होण्यात अडचणी निर्माण होत आहे.

 Farmers' Association warning of vetting of veterinarians | पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना काळे फासण्याचा शेतकरी संघटनेचा इशारा

पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना काळे फासण्याचा शेतकरी संघटनेचा इशारा

googlenewsNext
ठळक मुद्देतरी संबधित खात्याने तातडी लस उपलब्ध करून द्यावी अन्यथा शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र स्वरुपाचे आंदोलन करून संबधित

सांगली : जिल्ह्यात शेंळ्या-मेंढ्यांना देवी रोगाची लागण झाल्याने शेकडो मेंढ्या मृत पावल्या आहेत हजारो शेंळ्या-मेंढ्या बाधित आहेत. जिल्हा पशुसंवर्धन खात्याच्या भोंगळ कारभारामुळे लस उपलब्ध नसल्याने जिल्ह्याच्या पुर्वभागात जत कवठेमंहाकाळ खानापुर आटपाडी याभागात मोठ्या प्रमाणात देवी रोगांची लागण झाल्यामुळे पशूपालक हैराण झाले आहेत. तातडीने लस उपलब्ध करून द्यावी अन्यथा अधिकाऱ्यांना काळे फासण्याचा इशारा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोकराव माने यांनी दिला आहे.

संबधित खात्याचे डाँक्टरांचेही जाणिवपुर्वक दुर्लक्ष चालू आहे तरी पुरेशे डाँक्टरांची संख्या नसल्याने व नेमून दिलेल्या ठिकाणी पशुवैद्यकीय आधिकारी निवासांच्या ठिकाणी राहत नाहीत त्यामुळे सर्वच ठिकाणी उपचार होण्यात अडचणी निर्माण होत आहे. परिणामी उपचाराअभावी व लसी सुद्धा उपलब्ध नसल्याने शेंळ्या मेंढ्या पालकांनी जीवपाड जपलेले पशुधन वाया जात आहे .तरी संबधित खात्याने तातडी लस उपलब्ध करून द्यावी अन्यथा शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र स्वरुपाचे आंदोलन करून संबधित आधिकारी यांना काळे फासण्यात येईल असे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोकराव माने यांनी म्हटले आहे.

Web Title:  Farmers' Association warning of vetting of veterinarians

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sangliसांगली