शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

..अखेर 'त्या' शेतकऱ्यास मिळाली रीतसर वीज जोडणी; अधिकाऱ्यांसमोर इंग्रजीतून मांडल्या होत्या समस्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2023 16:54 IST

लक्ष्मण सरगर आटपाडी : आटपाडी तालुक्यातील यमाजी पाटलांचीवाडी गावच्या एका वयस्कर शेतकऱ्याने वीज चोरी पकडण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांसोबत चक्क इंग्रजी ...

लक्ष्मण सरगरआटपाडी : आटपाडी तालुक्यातील यमाजी पाटलांचीवाडी गावच्या एका वयस्कर शेतकऱ्याने वीज चोरी पकडण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांसोबत चक्क इंग्रजी भाषेत संवाद साधत आपली कैफियत मांडली होती. या वयस्कर शेतकऱ्यास अखेर न्याय मिळाला. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी त्यांची तात्काळ विजेची जोडणी करून देत शेतकरी वेताळ चव्हाण यांच्या भावनेला साद घातली आहे. वीज चोरी पकडण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांनी शेतकरी चव्हाण यांनी चक्क इंग्रजीमध्ये संभाषण साधत वीज चोरी पकडण्यासाठी आला आहात तर मला लगेच तात्काळ वीज जोडणी द्या त्यासाठी मी तयार असल्याचे इंग्रजीतून संभाषण केल्याचा व्हिडीओ प्रसारमाध्यमासह सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.आटपाडी तालुक्यामध्ये महावितरणच्यावतीने वीज चोरीला आळा घालण्यासाठी वीज चोरी पथकाची नियुक्ती केली आहे. या पथकांच्या माध्यमातून शेतीच्या विद्युत पंपासाठी वीज चोरी होण्याचे प्रमाण वाढले असल्याचे पथकांच्या निदर्शनास आले. ही चोरी पकडण्यासाठी यमाजी पाटलांची वाडी याठिकाणी पथक गेले होते. यावेळी सहाय्यक अभियंता सुनील पवार यांना वयस्कर शेतकरी वेताळ चव्हाण यांनी विद्युत पंपासाठी वीज चोरी करत असल्याचे निदर्शनास आले. अधिकाऱ्यांनी त्यांना त्यांचे सर्व साहित्य जप्त करत असल्याचे सांगितले. यावेळी शेतकरी चव्हाण यांनी अधिकाऱ्यांशी चक्क इंग्रजी मधून बोलण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी तुम्ही कायदेशीर कारवाई करा मला काही अडचण नाही. माझे वकील तुम्हाला त्याचे उत्तर देतील असे सांगतच मला जागेवरच वीज कनेक्शन देण्याची मागणी केली. त्यांचे हे इंग्रजीतील संभाषण सोशल मीडियीवर व्हायरल झाले होते.दरम्यान, गुरुवारी आटपाडी महावितरण उपविभागाचे मुख्य अभियंता संजय बालटे, सहाय्यक अभियंता सुनील पवार यांनी य.पा.वाडीचे शेतकरी वेताळ चव्हाण यांची भेट घेत त्यांना कृषी पंपाचे वीज कनेक्शन तात्काळ जोडणी करून देत त्याच्या मागणीला न्याय दिला.

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरी