भवानीनगरजवळ दुचाकीच्या धडकेत शेतकरी ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:17 IST2021-07-09T04:17:41+5:302021-07-09T04:17:41+5:30

इस्लामपूर : कराड-तासगाव रस्त्यावरील भवानीनगर (ता. वाळवा) गावच्या हद्दीत भरधाव वेगाने आलेल्या दुचाकीची धडक बसल्याने आबासाहेब बाजीराव पाटील (वय ...

Farmer killed in two-wheeler collision near Bhavnagar | भवानीनगरजवळ दुचाकीच्या धडकेत शेतकरी ठार

भवानीनगरजवळ दुचाकीच्या धडकेत शेतकरी ठार

इस्लामपूर : कराड-तासगाव रस्त्यावरील भवानीनगर (ता. वाळवा) गावच्या हद्दीत भरधाव वेगाने आलेल्या दुचाकीची धडक बसल्याने आबासाहेब बाजीराव पाटील (वय ४५, रा. येडेमच्छिंद्र) हे शेतकरी ठार झाले आहेत. हा अपघात सोमवारी दुपारी घडला. या अपघाती मृत्यूप्रकरणी दुुचाकी चालक अविराज भागवत सावंत (रा. बिचूद) याच्याविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आबासाहेब पाटील हे ५ जुलै रोजी दुपारच्या सुमारास शेतातून पायी चालत घरी निघाले होते. त्यावेळी तासगाव बाजूने दुचाकीवरून भरधाव वेगात आलेल्या अविराज सावंत याच्या निष्काळजीपणाने दुचाकीची धडक पाटील यांना बसली. यामध्ये पाटील यांच्या डोक्यात, कपाळावर आणि हातापायाला गंभीर जखम होऊन रक्तस्राव झाला. जखमी अवस्थेत त्यांना कऱ्हाड येथील रुग्णालयात दाखल केले होते. मात्र उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले होते. हवालदार उत्तम तुकाराम माळी यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे.

Web Title: Farmer killed in two-wheeler collision near Bhavnagar