कारंदवाडीनजीक अपघातात शेतमजूर ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:26 IST2021-05-14T04:26:22+5:302021-05-14T04:26:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क आष्टा : पेठ-सांगली मार्गावर कारंदवाडी (ता. मिरज) नजीक कारणे मोटारीनी दुचाकीला पाठीमागून दिलेल्या धडकेत दुुचाकीस्वार जागीच ...

कारंदवाडीनजीक अपघातात शेतमजूर ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टा : पेठ-सांगली मार्गावर कारंदवाडी (ता. मिरज) नजीक कारणे मोटारीनी दुचाकीला पाठीमागून दिलेल्या धडकेत दुुचाकीस्वार जागीच ठार झाला. यल्लाप्पा येगाप्पा बगले (वय ४५, रा. कारंदवाडी) असे मृताचे नाव आहे. ही घटना गुरुवारी सकाळी साडेअकराच्या दरम्यान घडली.
यल्लाप्पा बगले हे दुचाकीवरून (एमएच १० एई ३०७६) कृष्णानगरमार्गे कारंदवाडी येथील पेट्रोल पंपाकडे निघाले होते. कारंदवाडी जलस्वराज्य प्रकल्पांनजीक सांगलीहून इस्लामपूरकडे जाणाऱ्या दुचाकी (एमएच १० बी. एम. ५८१७) पाठीमागून बगले यांच्या दुचाकीस जोरदार धडक दिली. या धडकेत यल्लाप्पा बगले यांच्या डोक्याला जोरदार मार लागल्याने ते जागीच ठार झाले.
बगले यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. बगले यांचा मुलगा प्रशांत याने दुचाकी विजयकुमारलाल खतवाणी याच्याविरोधात आष्टा पोलिसांत फिर्याद दिली आहे. अधिक तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक दीपक सदामते करत आहेत.