नरसिंहपूर येथे विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:25 IST2021-09-13T04:25:42+5:302021-09-13T04:25:42+5:30

इस्लामपूर : नरसिंहपूर (ता. वाळवा) येथे शेतातील झाड तोडत असताना ते झाड ११ केव्हीए दाब क्षमतेच्या वीजवाहिनीवर पडून विजेचा ...

Farmer dies in electric shock at Narsinghpur | नरसिंहपूर येथे विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू

नरसिंहपूर येथे विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू

इस्लामपूर : नरसिंहपूर (ता. वाळवा) येथे शेतातील झाड तोडत असताना ते झाड ११ केव्हीए दाब क्षमतेच्या वीजवाहिनीवर पडून विजेचा धक्का बसल्याने ५२ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारी चार वाजता घडली.

बबन शामराव माने (वय ५२) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. माने हे दुपारी बहे पुलाजवळ आपल्या शेतातील झाड तोडत होते. झाड तोडत असताना तुटून ते शेतातून जाणाऱ्या विजेच्या तारेवर पडले. त्यातून वीजप्रवाह प्रवाहित होऊन माने यांना विजेचा धक्का बसला. त्यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची वर्दी पोलीस पाटील दीपक बबन मदने यांनी पोलिसात दिली आहे. उपनिरीक्षक समाधान लवटे अधिक तपास करत आहेत. माने यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, तीन मुली, भाऊ असा परिवार आहे.

Web Title: Farmer dies in electric shock at Narsinghpur