दाेन दुचाकींच्या धडकेत शेतकरी दाम्पत्य ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:23 IST2021-02-05T07:23:39+5:302021-02-05T07:23:39+5:30
चौगुले यांची मानमोडी रस्त्यावर द्राक्षबाग आहे. चाैगुले दाम्पत्य शेतातील काम आटोपून रविवारी रात्री आठ वाजता दुचाकीवरून सोनीस घरी परत ...

दाेन दुचाकींच्या धडकेत शेतकरी दाम्पत्य ठार
चौगुले यांची मानमोडी रस्त्यावर द्राक्षबाग आहे. चाैगुले दाम्पत्य शेतातील काम आटोपून रविवारी रात्री आठ वाजता दुचाकीवरून सोनीस घरी परत येत होते. याचवेळी पेट्रोल पंपावर काम करणारे अमित पाटील हे सोनीतून तासगाव फाट्याकडे दुचाकीवरून निघाले होते. यावेळी ट्रॅक्टरला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात समोरून दुचाकी आल्याने दाेन्ही दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात दोन्ही दुचाकींचा चक्काचूर झाला. अपघातात चाैगुले दाम्पत्यासह अमित पाटील हाही गंभीर जखमी झाला. तिघांनाही तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र अनिल चौगुले यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यांची पत्नी सखुबाई चौगुले यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. जखमी अमित पाटील याच्यावर उपचार सुरू आहेत.
अपघाताबाबत मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. पती-पत्नीच्या अपघाती मृत्युमुळे सोनी येथे हळहळ व्यक्त होत होती. चाैगुले दाम्पत्याच्या पश्चात दोन मुले, सून असा परिवार आहे.
फाेटाे : ०१ अनिल चाैगुले
फाेटाे : ०१ सखुबाई चाैगुले