फरिदा इनामदार नेट परीक्षा उत्तीर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:28 IST2021-02-09T04:28:51+5:302021-02-09T04:28:51+5:30
आष्टा : येथील कु. फरीदा रफिक इनामदार या जॉईन सी. एस. आय. आर. युजीसी नेट २०२० परीक्षा उत्तीर्ण ...

फरिदा इनामदार नेट परीक्षा उत्तीर्ण
आष्टा : येथील कु. फरीदा रफिक इनामदार या जॉईन सी. एस. आय. आर. युजीसी नेट २०२० परीक्षा उत्तीर्ण झाल्या. त्यांचा देशात १६ वा क्रमांक आला. त्यांना ९९.२३ टक्के गुण मिळाले. फरिदा इनामदार यांनी गेट २०२० परीक्षेतही देदीप्यमान यश मिळविले आहे. सध्या त्या श्रीमती कस्तुरबाई वालचंद कॉलेज सांगली येथे बायोटेक्नॉलॉजी विषयासह अध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. त्यांना प्राचार्य डॉ. बी. पी. लाडेगावकर, विभागप्रमुख डॉ. एस. एस. वाडकर यांचे मार्गदर्शन लाभले.
फरिदा इनामदार यांनी मिळविलेल्या देदीप्यमान यशाबद्दल आष्टा पश्चिम भाग विकास सोसायटीचे संचालक साजिद इनामदार, दत्तराज हिप्परकर यांनी सत्कार केला. यावेळी रफीक इनामदार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
फोटो - ०८०२२०२१-आयएसएलएम- फरीदा इनामदार