गजल-ए-कोहिनूर इलाही जमादार यांना साश्रुनयनांनी निरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:30 IST2021-02-05T07:30:49+5:302021-02-05T07:30:49+5:30
स्वत:च्या लेखणीनं मराठी गझलविश्व समृद्ध करणारे गझलकार जमादार यांचे रविवारी सकाळी दहा वाजता दुधगाव येथे निधन झाले. आष्टा-बागणी रोडवरील ...

गजल-ए-कोहिनूर इलाही जमादार यांना साश्रुनयनांनी निरोप
स्वत:च्या लेखणीनं मराठी गझलविश्व समृद्ध करणारे गझलकार जमादार यांचे रविवारी सकाळी दहा वाजता दुधगाव येथे निधन झाले. आष्टा-बागणी रोडवरील दफनभूमीमध्ये कला, साहित्य आणि संगीत क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत दफनविधी करण्यात आला. पुणे, नांदेड, माजलगाव, परभणी, लातूर, कराड, कोल्हापूर, सातारा येथील संगीत आणि साहित्य क्षेत्रातील मान्यवरांना आदरांजली वाहताना अश्रू अनावर झाले. त्यांचे कार्य चिरंतर राहण्यासाठी सरकार आणि ग्रामस्थांच्या पुढाकाराने त्यांचे स्मारक उभारण्याची मागणी करीत विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आदरांजली वाहिली. यावेळी प्रा. विकास कदम, विमल मुदाडे (लातूर), गायिका लक्ष्मी लहाने, डॉ. संजय भोसले, प्रा. संध्या पाटील, कवी अशोक डोंगरे (माजलगाव, बीड) यांच्यासह मान्यवरांनी इलाही जमादार यांच्या आठवणी चिरंतर राहण्यासाठी स्मारक उभारण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेण्याचे आवाहन केले.
यावेळी गौस शिकलगार, विलास गावडे, माजी उपसरपंच विलास आवटी, बळिराम कांबळे (नांदेड), अभिनेता संभाजी हमद, प्रकाश शिंदे (पुणे), प्रशांत दिंडोरकर, संतोष घुले, निवृत्त पोलीस उपअधीक्षक अरविंद पाटील, अनिल गुंजाळ, गंगाधर रासगे, प्रशांत पेंडसे, विमल मुदाळे, जमादार यांचे बंधू बालेचाँद जमादार, नातू सुहान जमादार, पुतणे अस्लम जमादार, जावेद जमादार, कैलास आवटी, अख्तर पिरजादे, तलाठी शिवाजी सकरे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
चौकट....
उपमुख्यमंत्री, पालकमंत्र्यांची ट्विटद्वारे आदरांजली
मराठी गझलविश्व समृद्ध करणारे सुप्रसिद्ध गझलकार इलाही जमादार यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री जयंत पाटील, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विटर आणि फेसबुकच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या संदेशाचे वाचन माजी उपसरपंच विलास आवटी यांनी उपस्थितांसमोर केले.
फाेटाे : ०१ दुधगाव १