कुंडलवाडीतील वठलेले झाड धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:18 IST2021-06-11T04:18:12+5:302021-06-11T04:18:12+5:30

कुंडलवाडी (ता. वाळवा) येथील संभाजी चौकातील जुन्या मराठी शाळेच्या समोर वठलेले व धोकादायक झाड. लोकमत न्यूज नेटवर्क तांदूळवाडी : ...

The fallen tree in Kundalwadi is dangerous | कुंडलवाडीतील वठलेले झाड धोकादायक

कुंडलवाडीतील वठलेले झाड धोकादायक

कुंडलवाडी (ता. वाळवा) येथील संभाजी चौकातील जुन्या मराठी शाळेच्या समोर वठलेले व धोकादायक झाड.

लोकमत न्यूज नेटवर्क

तांदूळवाडी : कुंडलवाडी (ता. वाळवा) येथील अचानक गणेश मंडळाने पंधरा वर्षांपूर्वी संभाजी चौकाशेजारी असणाऱ्या जुन्या मराठी शाळेच्या समोर दहा झाडांचे वृक्षारोपण केले होते. त्यापैकी नऊ झाडे व्यवस्थित आहेत तर एक झाड पूर्णपणे वठलेल्या स्थितीत आहे. गावाला होणाऱ्या विद्युत पुरवठ्यासाठी जोडलेल्या तारांच्यापासून जवळच आहे. धोकादायक झाड तोडण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

झाड पडले तर या चौकात असणारे विविध व्यवसायानिमित्त दुकाने व टपऱ्यांचे नुकसान होणार आहे. याचबरोबर हा चौक असून येथून दुचाकी व चारचाकी वाहनांची व लोकांचीही वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. या चौकातून ऐतवडे खुर्द, येलूर, तांदूळवाडी, कुरळप या गावांना जोडणारा रस्ता जातो. म्हणून कदाचित हे झाड पावसाच्याबरोबर जर वारा सुटला तर पडण्याची शक्यता आहे. कदाचित विद्युत प्रवाह करणाऱ्या तारेवर कोसळले तर मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता लोकांच्यामध्ये आहे. तेव्हा येथील ग्रामपंचायतीने याची दक्षता घेऊन निर्णय घेणे गरजेचे आहे.

Web Title: The fallen tree in Kundalwadi is dangerous