कुपवाडमधील जिल्हा परिषद शाळेची पडझड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:19 IST2021-06-20T04:19:17+5:302021-06-20T04:19:17+5:30
फोटो ओळ : कुपवाडमधील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीची दुरुस्ती करावी अशी मागणी जिल्हा परिषद अध्यक्ष प्राजक्ता कोरे यांच्यााकडे केली ...

कुपवाडमधील जिल्हा परिषद शाळेची पडझड
फोटो ओळ : कुपवाडमधील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीची दुरुस्ती करावी अशी मागणी जिल्हा परिषद अध्यक्ष प्राजक्ता कोरे यांच्यााकडे केली आहे. यावेळी सनी धोतरे, अनिल कवठेकर, प्रकाश व्हनकडे, विलास माळी, अमर दिडवळ, बिरू आस्की, समीर मुजावर उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
कुपवाड : शहरातील मुख्य चौकात असलेल्या जिल्हा परिषद मराठी मुलांच्या शाळेमध्ये असणाऱ्या १२ खोल्याची अत्यंत दुरवस्था व पडझड झाली आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर एखादी गंभीर घटना घडू शकते. त्यामुळे या इमारतीची दुरुस्ती तत्काळ करावी, अशी मागणी कुपवाड शहर व परिसर संघर्ष समितीच्या वतीने जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांच्याकडे केली.
कुपवाडमधमील या शाळेत १२ खोल्यांची अत्यंत दुरवस्था झाली आहे. या इमारत धोकादायक बनली आहे. कित्येक वर्ष या शाळेकडे जिल्हा परिषद प्रशासनाने लक्ष दिले नसल्याने या शाळेची अवस्था अशोभनीय अशी झालेेेली आहे. सध्या जिल्हा परिषद शाळेमध्ये ऑनलाइन तास सुरू झालेले आहेत. या इमारतीत अक्षरशः येथील शिक्षक लोकांना बसण्यासाठी जागा ही शिल्लक नाही.
शाळेच्या प्रत्येक खोलीमधील कौले फुटलेले आहेेे. पावसामुळे प्रत्येक खोलीत पाणीच पाणी झाले आहे.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर एखादी गंभीर घटना घडू शकते. तत्पूर्वी या इमारतीची दुरुस्ती तत्काळ करावी, अशी मागणी जिल्हा परिषद अध्यक्ष प्राजक्ता कोरे यांच्यााकडे केली आहे. यावेळी कुपवाड शहर व परिसर संघर्ष समितीचे अध्यक्ष सनी धोतरे, कार्याध्यक्ष अनिल कवठेकर, खजिनदार प्रकाश व्हनकडे, विलास माळी, अमर दिडवळ, बिरू आस्की, समीर मुजावर आदी उपस्थित होते.