शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

युवकांना ३० लाखाचा गंडा घालणाऱ्या तोतया नौदल अधिकाऱ्याला आष्टा पोलिसांकडून अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2022 18:51 IST

नौदलात भरतीचे अमिष 

लोकमत न्यूज नेटवर्क: आष्टा, सुरेंद्र शिराळकर

बहादुरवाडी ता वाळवा येथील नितीन मानसिंग दळवी वय २७ या युवकासह सहा युवकांना ३० लाखाला फसवणाऱ्या आकाश काशिनाथ डांगे (वय २३ राहणार पाडळी बुद्रुक ता फलटण) या तोतया नौदल अधिकाऱ्यावर शनिवारी रात्री उशिरा आष्टा पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला त्यास आष्टा पोलिसांनी अटक केल्याने युवकांना लाखोंना गंडा घालणारा मोठा मासा पोलिसाच्या गळाला लागला आहे.

बहादुरवाडी येथील नितीन दळवी हा सैन्यात भरतीसाठी प्रयत्न करत होता याचवेळी सेवानिवृत्त जवानामुळे त्याची व आकाश डांगेची गावातच भेट झाली वेरना गाडी क्रमांक एम एच ४२ ए आर २००५ या चारचाकी गाडीतून नौ दल अधिकाऱ्याच्या वेषात आकाश डांगे बहादूरवाडीत आला यावेळी नितीन सोबत सैन्य भरतीची तयारी करणारे त्याचे मित्र संकेत हिंदुराव माने व दीपक अनिल पाटील (दोघे राहणार भडकंबे ता वाळवा), रोहित मानसिंग दळवी( राहणार बहादूरवाडी), राजकुमार नागप्‍पा कोळी (राहणार आष्टा )व राहुल जयवंत गायकवाड (राहणार काकाचीवाडी ता वाळवा) हे सहा जण आकाश डांगेला भेटले. 

यावेळी तुमचे काम नक्की होईल प्रत्येकी पाच लाख रुपये द्यावे लागतील असे सांगितले ऑक्टोबर २०१९ मध्ये डांगेने सर्वांना नियुक्ती पत्र दिले व ओरिसा येथे मेडिकल साठी उपस्थित राहण्यास सांगितले २१ मार्च २०१९ रोजी आकाश डांगे सोबत रेल्वेने भुवनेश्वरला गेले डांगे सर्वांना रेल्वे स्थानकावर थांबवून भरती प्रक्रियेची माहिती घेण्यासाठी गेला व वादळामुळे ट्रेनिंग सेंटर विस्कळीत झाल्याने सांगितले. 

आकाश डांगेला सर्वांनी नियुक्ती बाबत वारंवार फोन केलयानंतर त्याने नवीन नियुक्त पत्रे दिले २२ मे २०२० रोजी मेडिकल साठी उपस्थित राहण्यास सांगितले मात्र मार्च २०२० मध्ये कोरोना व लॉकडाऊन मुळे भरतीच झाली नाही भिगवण पोलिसांत आकाश डांगे विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळाल्यानंतर सर्वजण डांगेच्या पाडळी येथील गावी गेले त्याने तीस लाख रुपयाचा इंडसन बँकेचा धनादेश दिला मात्र तो वटलाच नाही अखेर सर्व युवकांनी आष्टा पोलीस ठाण्यात डांगे विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला पोलीस निरीक्षक अजित सिद यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब बाबर,नितीन पाटील, अमोल शिंदे यांनी पुणे येथून डांगेला ताब्यात घेतले.

आष्टा पोलिसांनी तोतया अधिकारी म्हणून वावरणाऱ्या आकाश डांगे यांच्याकडून नौ दल अधिकारी, पोलीस अधिकारी पोशाख तसेच नियुक्तीपत्रे ,शिक्के यासह विविध कागदपत्रे जप्त केली आहेत

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSangliसांगली