शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

परप्रांतीय एजंटांमार्फत बनावट नोटा चलनात- : सांगलीत सहा महिन्यांपासून छपाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 22:15 IST

बनावट नोटांची छपाई करणारा मुख्य सूत्रधार विश्वनाथ जोशी याने सहा महिन्यांपासून सांगलीत बनावट नोटांची छपाई सुरु केली होती,

ठळक मुद्देगर्दीची ठिकाणे टार्गेट

सांगली : बनावट नोटांची छपाई करणारा मुख्य सूत्रधार विश्वनाथ जोशी याने सहा महिन्यांपासून सांगलीत बनावट नोटांची छपाई सुरु केली होती, अशी माहिती गांधीनगर पोलिसांच्या चौकशीतून पुढे आली आहे. नोटांची छपाई करुन त्या चलनात आणण्यासाठी गर्दीची ठिकाणे निवडली होती. यासाठी त्याने परप्रांतीय तरुणांची एजंट म्हणून नियुक्ती केली होती, अशी माहिती अटकेतील अभिजित पवार याच्या चौकशीतून निष्पन्न झाली आहे. दरम्यान, जोशी याच्याविरुद्ध सांगली पोलिसांत डिझेल चोरीसह अन्य गुन्हे दाखल आहेत.

 

कोल्हापुरातील गांधीनगर पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी अभिजित पवार (रा. उचगावपैकी ता. करवीर) यास अटक केली होती. त्याच्याकडून बनावट नोटा जप्त केल्या होत्या. या नोटा त्याने विश्वनाथ जोशी याच्याकडून आणल्याची कबुली दिली. तसेच इचलकरंजी (जि. कोल्हापूर) येथील प्रवीणकुमार उपाध्ये हाही त्याच्याकडून नोटा आणत असल्याचे सांगितले होते. जोशीच्या शोधासाठी दोन दिवसांपूर्वी सांगलीत शामरावनगरमध्ये अरिहंत कॉलनीत ‘विजया निवास’ या बंगल्यावर छापा टाकला. पण तत्पूर्वीच जोशी तेथून पसार झाला होता. जोशीच्या डोंगरसोनी (ता. तासगाव) येथील गावातही छापा टाकून शोध घेतला. मात्र तो सापडला नाही. जोशी या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार आहे. तो सापडत नसल्याने गांधीनगर पोलिसांचा तपास पुढे सरकला नाही.

सहा महिन्यांपूर्वी सांगली शहर पोलिसांनी बनावट नोटांचे प्रकरण उजेडात आणले. पश्चिम बंगालपर्यंत पोलिसांनी तपास केला. हा तपास थांबल्यानंतर जोशीने स्वत:च्या बंगल्यात बनावट नोटांची छपाई सुरु केल्याची माहिती तपासातून पुढे आली आहे. सांगली, कोल्हापूर व सातारा येथील काहीजणांशी संपर्क साधून, या नोटा चलनात आणण्याचा त्याने प्रयत्न केला. यामध्ये अभिजित पवार, प्रवीणकुमार उपाध्ये यांचा समावेश आहे. आठवडा बाजारासह अन्य गर्दीच्या ठिकाणी नोटा चलनात आणण्याचे त्याने नियोजन केले होते. यासाठी परप्रांतीय तरुणांची एजंट म्हणून नियुक्ती केली होती. गेल्या आठवड्यात सांगलीत संजयनगरच्या आठवडा बाजारात बनावट नोटा खपविल्याचा प्रकार घडला होता. यामागे जोशीचा हात असण्याची शक्यता आहे. आतापर्यंत किती नोटांची छपाई केली, याची माहिती जोशी सापडल्याशिवाय समजणार नाही, असे गांधीनगर पोलिसांनी सांगितले.जोशीविरुद्ध गुन्हेजोशी याच्याविरुद्ध सांगली पोलिसांत यापूर्वी डिझेल चोरीसह अन्य गुुन्हे दाखल आहेत. काही महिन्यांपूर्वी तो जामिनावर बाहेर आला होता. सांगलीत त्याने प्लॉट घेऊन आलिशान बंगला बांधला. एका राजकीय पक्षात तो काम करीत होता. गांधीनगर पोलीस मागावर असल्याची चाहूल लागताच तो बंगल्यातून मोठी बॅग घेऊन बाहेर पडला. या बॅगेत कदाचित बनावट नोटा असण्याची शक्यता आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSangliसांगली