शिराळा मतदारसंघात विकासकामे करुनही अपयश : सत्यजित देशमुख
By Admin | Updated: November 12, 2014 22:58 IST2014-11-12T22:27:00+5:302014-11-12T22:58:49+5:30
ढील काळात स्वार्थी प्रवृत्तींना बाजूला सारून झुंजार कार्यकर्त्यांची बांधणी करण्यावर लक्ष केंद्रित करणार आहे,

शिराळा मतदारसंघात विकासकामे करुनही अपयश : सत्यजित देशमुख
सागाव : शिराळा विधानसभा मतदारसंघामध्ये ५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त विकासकामे करुन देखील अपयशाला सामोरे जावे लागले, याची खंत वाटते. एवढी वर्षे शिवाजीराव देशमुख यांनी लोकांसाठी अहोरात्र काम केले. परंतु लोकांनी फक्त आमच्याकडून फायदाच बिघितला. यापुढील काळात स्वार्थी प्रवृत्तींना बाजूला सारून झुंजार कार्यकर्त्यांची बांधणी करण्यावर लक्ष केंद्रित करणार आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस सत्यजित देशमुख यांनी केले.
शिराळा येथे शिराळा तालुक्यातील कार्यकर्त्यांची चिंतन बैठक घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते. तालुका काँग्रेस अध्यक्ष हणमंतराव पाटील अध्यक्षस्थानी होते. ज्येष्ठ नेते संपतराव देशमुख, के. डी. पाटील, प्रतापराव यादव, महादेव कदम, सभापती चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
सत्यजित देशमुख म्हणाले की, ५00 कोटींची कामे आम्ही केली. परंतु लोकांनी विकास कामांना महत्त्व दिले नाही, ही दुर्दैवाची बाब आहे. विरोधकांनी दाखविलेल्या खोट्या आश्वासनांमुळे व वारेमाप पैशाच्या वापरामुळे तसेच काँग्रेस-राष्ट्रवादीची ऐनवेळी आघाडी तुटली आणि अचानक उमेदवारीस सामोरे जावे लागले. प्रचाराला वेळ कमी मिळाला. लोकांपर्यंत पोहोचण्यात कार्यकर्ते कमी पडले. यापुढील काळात स्वार्थी कार्यकर्त्यांना बाजूला सारुन झुंजार कार्यकर्त्यांची बांधणी करुन संघटना मजबूत करणार आहे.
हणमंतराव पाटील म्हणाले की, निवडणूक निकालानंतर अनेक अफवा व गैरसमज पसरविण्यात आले. यामध्ये कोणतेही तथ्य नाही. गेली २५ वर्षे पक्षाचे व प्रशासनातील नेतृत्व मी करतोय. राजकारणात कोण कोणाला संपवू शकत नाही. ज्याच्या त्याच्या कर्तृत्वावर जो तो मोठा होत असतो.
संपतराव देशमुख, पी. वाय. पाटील, अभिजित पाटील, विकास नांगरे, प्रजित यादव, निवृत्ती नरुटे, बी. जी. पाटील, सुभाष पाटील, कैलास पाटील, हरेष पाटील, विषाल घोलप, शारदा घारगे, नारायण खोत, तानाजी पाटील उपस्थित होते. (वार्ताहर)