ऑक्सिजन टॅंकर्सना जीपीएस प्रणालीसाठी ‘फाडा’चा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:34 IST2021-04-30T04:34:04+5:302021-04-30T04:34:04+5:30
सांगली : ऑक्सिजनची वाहतूक करणाऱ्या सर्व वाहनांना जीपीएस प्रणाली बसवून देण्यासाठी फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन ऑफ इंडिया ...

ऑक्सिजन टॅंकर्सना जीपीएस प्रणालीसाठी ‘फाडा’चा पुढाकार
सांगली : ऑक्सिजनची वाहतूक करणाऱ्या सर्व वाहनांना जीपीएस प्रणाली बसवून देण्यासाठी फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन ऑफ इंडिया (फाडा) संघटनेने पुढाकार घेतला आहे.
देशभरात सध्या ऑक्सिजन पुरवठ्यामध्ये आणीबाणीची स्थिती आहे. ऑक्सिजनअभावी कोरोनाग्रस्तांचे जीव जात असल्याच्या घटना घडत आहेत. शासनाने प्राणवायू उपलब्धतेसाठी युद्धस्तरावर मोहीम हाती घेतली असून, अनेक टॅंकर्स याकामी गुंतले आहेत. या सर्व टॅंकर्सना संघटनेतर्फे जीपीएस प्रणाली बसवून दिली जाणार आहे. त्याद्वारे टॅंकरमध्ये द्रवरुप ऑक्सिजन भरल्यापासून त्याचा रुग्णालयापर्यंतचा प्रवास ट्रॅक होणार आहे. यामुळे ऑक्सिजन पुरवठ्यामध्ये गती येण्याची अपेक्षा आहे.
या उपक्रमासाठी संघटनेच्या सांगली जिल्हा ऑटोमोबाईल डिलर्स असोसिएशनने ६५ हजार रुपयांची देणगी दिल्याची माहिती पश्चिम महाराष्ट्र ऑटोमोबाईल डीलर्स असोसिशनचे माजी अध्यक्ष अविनाश पोरे, जिल्हाध्यक्ष दीपक पाटील, सचिव केदार माने यांनी दिली.