सुविधांमुळे जिल्हा परिषद शाळांकडील ओढा वाढेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:27 IST2021-03-31T04:27:18+5:302021-03-31T04:27:18+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : मॉडेल स्कूल योजनेतून जिल्हा परिषद शाळेत सुविधा मिळाल्याने गावातील मुले जिल्हा परिषद शाळेतच ...

सुविधांमुळे जिल्हा परिषद शाळांकडील ओढा वाढेल
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : मॉडेल स्कूल योजनेतून जिल्हा परिषद शाळेत सुविधा मिळाल्याने गावातील मुले जिल्हा परिषद शाळेतच शिकण्याचा आग्रह धरतील. या शाळांकडील ओढा वाढेल, असा विश्वास आमदार सुधीर गाडगीळ यांनी व्यक्त केला.
बुधगाव येथील जिल्हा परिषद शाळा नंबर २ मध्ये माॅडेल स्कूल उपक्रमांतर्गत पेयजल सुविधा, क्रीडांगण तयार करणे, वर्गखोल्या दुरुस्त करणे, शौचालय बांधकाम करणे अशा ५० लाखांच्या विकासकामांचा प्रारंभ व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार गाडगीळ व जिल्हा परिषद उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी पंचायत समिती सभापती त्रिशला खवाटे, उपसभापती अनिल आमटवणे, विक्रम पाटील, सरपंच सुरेश ओंकारे, उपसरपंच सुखदेव गोसावी, गटविकास अधिकारी आप्पासाहेब सरगर, सुनीता वाघमारे, प्रसाद कालगावकर, बाळासाहेब पाटील, राजू शिवकाळे आदी उपस्थित होते.